‘मैं भी चौकीदार’द्वारे मोदींचा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:53 IST2019-04-01T00:53:32+5:302019-04-01T00:53:37+5:30

कोल्हापूर : ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडत भाजप कार्यकर्त्यांशी ...

Modi's dialogue through 'I too watch' | ‘मैं भी चौकीदार’द्वारे मोदींचा संवाद

‘मैं भी चौकीदार’द्वारे मोदींचा संवाद

कोल्हापूर : ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी गर्दी करून याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘मोदी... मोदी...’, ‘मैं भी चौकीदार...’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीहून देशभरातील ५०० ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोल्हापुरातील जयलक्ष्मी हॉल येथे भाजप महानगरतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, महेश जाधव, संदीप देसाई, राहुल चिकोडे, नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता भालकर , अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मैत्राणी, आर. डी. पाटील, संतोष भिवटे, वैशाली पसारे, भारती जोशी, किशोरी स्वामी, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, डॉ. सदानंद राजवर्धन, सुरेश जरग, आदी उपस्थित होते.

Web Title: Modi's dialogue through 'I too watch'