शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दागिने, संपत्ती, आरक्षणाबाबत मोदींचा खोटा प्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 4:29 PM

'काळा पैसा एका व्यक्तीच्या नावावर'

कोल्हापूर : काँग्रेस सत्तेत आल्यास तुमच्या दागिन्यांचे ऑडिट होईल, स्वकमाईच्या संपत्तीचे अल्पसंख्याकांना वाटप होईल, वारसा कर लावला जाईल, ओबीसी, एससी, एसटीचे आरक्षण बदलले जाईल, असा खोटा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. ज्या गोष्टी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातच नाहीत, काँग्रेसचा काेणी नेता तसे बोललेला नाही, अशा खोट्या गाेष्टी सांगून मोदी जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला.दहा वर्षे सत्तेत असणाऱ्या मोदी आणि भाजपने असला खोटा प्रचार करण्याचे सोडून त्यांनी केलेल्या विकास कामांवर बोलावे, जी कामे अपूर्ण आहेत त्यावर बोलावे. अब की बार ४०० पार असा आत्मविश्वास मोदींचा असेल तर मग अशा खोट्या प्रचाराची का आवश्यकता भासत आहे याचे आश्चर्य वाटत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

सॅम पित्रोदा हे भारताचे नागरिकही नाहीत, त्यांनी कुठे वक्तव्य केले त्याचा भारताशी काहीही संबंध नसताना वारसा कर लावला जाईल असा कांगावा मोदी यांच्याकडून केला जात आहे तो अत्यंत चुकीचा आहे. उलट भारतात लागू असलेला वारसा कराचा कायदा राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५ मध्ये रद्द करण्यात आला, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडालेला आहे, परत सत्तेवर येऊ की नाही याबाबत मोदींना आत्मविश्वास राहिलेला नाही म्हणून ते खोटी भीती घालून, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

काळा पैसा एका व्यक्तीच्या नावावरपरदेशी बँकेत असलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. काळ्या पैशाबाबतची संपूर्ण माहिती स्वीस बँकेकडून तसेच पनामा पेपर्सच्या माध्यमातून सरकारकडे आहे. त्यांची नावे, पत्ते, रक्कम याची माहिती असूनही केंद्र सरकार कारवाई करत नाही. केवळ सेटलमेंट करण्यात येत आहे. आता हा सगळा काळा पैसा भारतातील एका व्यक्तीच्या खात्यावर जमा झाला असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदी