मोबाईल चोरटा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:30 IST2021-08-14T04:30:22+5:302021-08-14T04:30:22+5:30

मलकापूर येथील आदित्य मोबाईल दुकानातील दोन लाखांच्या चोरीचा शाहूवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासातच छडा लावला. याप्रकरणी कल्पेश ...

Mobile thief found | मोबाईल चोरटा सापडला

मोबाईल चोरटा सापडला

मलकापूर येथील आदित्य मोबाईल दुकानातील दोन लाखांच्या चोरीचा शाहूवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासातच छडा लावला. याप्रकरणी कल्पेश नारायण वारंग (वय २०, रा. करुंगळे, ता. शाहूवाडी) या सराईत चोरट्याला मुद्देमालासह पकडण्यात आले . मलकापूर - शाहूवाडी न्यायालयाने त्याला मंगळवार (दि.१७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी मिळालेली महिती अशी, मलकापूर शहरातील कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गालगतच्या आदित्या मोबाईल शॉपीचे छत सिलिंग तोडून अज्ञात चोरट्याने विविध कंपन्यांचे १८ मोबाईल संच आणि इतर पूरक साहित्य मिळून २ लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. दुकान मालक बाबासो लक्ष्मण पोवार (रा. गणेशनगर, ता. शाहूवाडी) यांच्या निदर्शनास ही बाब आली. याबाबत त्यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्वरेने चोरट्यांचा शोध सुरू केला. यावेळी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख करीत आहेत .

फोटो

कल्पेश वारंग

Web Title: Mobile thief found