शाहुपुरीतून मोबाईल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST2021-06-25T04:17:34+5:302021-06-25T04:17:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील शाहुपूरी दुस-या गल्लीतील श्री महालक्ष्मी गृहउद्योग येथे नाष्ट्यासाठी गेलेल्या ग्राहकाचा ७ हजार रुपये ...

Mobile theft from Shahupuri | शाहुपुरीतून मोबाईल चोरी

शाहुपुरीतून मोबाईल चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील शाहुपूरी दुस-या गल्लीतील श्री महालक्ष्मी गृहउद्योग येथे नाष्ट्यासाठी गेलेल्या ग्राहकाचा ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस गेला. ही घटना बुधवारी (दि.२३) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत परेश दिनेशचंद्र शेठ (वय ५३, रा. अनंतपुरम, बापट कॅम्प, कोल्हापूर) यांनी आपला मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

कुडीत्रेतून दुचाकी चोरी

कोल्हापूर : करवीर तालक्यातील कुडीत्रे येथील यशवंत बॅंक परिसरात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने बनावट चावीने अगर लॉक तोडून चोरुन नेल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याबाबत दुचाकीमालक सुनील भिकाजी सुतार (वय ३६, रा. कुडीत्रे) यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

मोपेडच्या धडकेत महिला जखमी

कोल्हापूर : भरधाव वेगाने व हयगयीने मोपेड चालवून समोरुन येणा-या दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी दुपारी धैर्यप्रसाद चौकात घडली. याबाबत जखमीचे पती समीर पद्माकर राजगुरु (वय ४६, रा. कारंडे मळा, ताराबाई पार्क) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात अज्ञात मोपेडचालकाविरुध्द तक्रार दिली आहे.

Web Title: Mobile theft from Shahupuri