मोबाईल दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:29 IST2021-08-13T04:29:17+5:302021-08-13T04:29:17+5:30

मलकापूर : मलकापूर येथील आदित्य मोबाईल शॉपी या दुकानातील दोन लाख रुपये किमतीचे मोबाईल व साहित्य ...

Mobile shoplifting | मोबाईल दुकानात चोरी

मोबाईल दुकानात चोरी

मलकापूर :

मलकापूर येथील आदित्य मोबाईल शॉपी या दुकानातील दोन लाख रुपये किमतीचे मोबाईल व साहित्य अज्ञाताने गुरुवारी मध्यरात्री लंपास केले. याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.

अधिक महिती अशी, शहरातील आदित्य मोबाईल शॉपीतून गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे सिलिंग शटर फोडून मोबाईल व ॲक्सेसरीज असे दोन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. सकाळी दुकानाचे मालक बाबासो पवार दुकान उघडण्यास आले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पलिकेने शहरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

Web Title: Mobile shoplifting