मोबाईल, दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST2021-04-07T04:24:15+5:302021-04-07T04:24:15+5:30

कोल्हापूर : शहरात दाभोळकर चौकातील हॉस्टेलवरुन मोबाईल तसेच प्रतिभानगर व ताराबाई पार्कमधून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. दाभोळकर चौकातील ...

Mobile, bike theft | मोबाईल, दुचाकी चोरी

मोबाईल, दुचाकी चोरी

कोल्हापूर : शहरात दाभोळकर चौकातील हॉस्टेलवरुन मोबाईल तसेच प्रतिभानगर व ताराबाई पार्कमधून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या.

दाभोळकर चौकातील एका हॉस्टेलमध्ये सौरभ सुरेश मगदूम (वय १९ मुळ गाव-मौजे सांगाव, ता. कागल. सद्या रा. दाभोळकर चौक) हा आपल्या रुम नं. ५ मध्ये झोपला असता अज्ञात चोरट्याने दरवाजा कशाने तरी उघडून आतील बेडवर ठेवलेला सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला. याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, निखिल राजाराम मोरे (वय ३० रा. संकपाळनगर, कसबा बावडा) यांनी आपली दुचाकी ताराबाई पार्कमधील सुर्वे कॉलनीत घरानजीक पार्किंगमध्ये उभी केली असता अज्ञाताने चोरून नेली. याची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

तसेच प्रतिभा नगरातील सागरमाळ परिसरातून आयुषी अजीत गुंदेशा (रा. प्रतिभानगर) यांनी दारातच उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने बनावट चावीचा वापर करुन चोरुन नेली. या चोरीची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

Web Title: Mobile, bike theft