शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: मनसेने किणी टोलनाक्यावरील टोलवसुली पाडली बंद, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 17:03 IST

राष्ट्रीय प्राधिकरणच्यावतीने मुदत संपून सुद्धा किणी टोलनाक्यावरील टोल वसुली सुरूच

संतोष भोसलेकिणी :  मुदत संपून देखील पुणे-बेंगलोर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) टोल नाक्यावरील टोल वसुली सुरूच ठेवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्यात जोरदार झडापड झाली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनावेळी सुमारे दहा ते पंधरा मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.राष्ट्रीय प्राधिकरणच्यावतीने मुदत संपून सुद्धा किणी टोलनाक्यावरील टोल वसुली सुरूच ठेवली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने याआधीच आंदोलन करत गंभीर इशारा दिला होता. अध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी टोलनाक्यावर बँड पथकाच्या गजरात कलश घेऊन महिला व कार्यकर्ते दाखल झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील टोलनाक्याच्या बुथ जवळील लेनमध्ये कलश ठेवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली.यानंतर पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना ताब्यात घेत पोलीस गाडीत घालून पोलीस ठाण्याकडे नेले. दरम्यान यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये जोरदार झडापड झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला नेले मात्र, नाक्याजवळ ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान, राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चंद्रकांत बर्डे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना राजू जाधव यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांची लूट चालवली असून मुदत संपलेला टोल नाका बंद होईपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.आंदोलनात संतोष चव्हाण, प्रवीण माने, वैभव हिरवे, कल्पना पाटील, वंदना संताजी, उज्वला मिसाळ, अक्षय माने, अशोक पाटील, गणेश बुचडे, अजित पाटील , यांचेसह  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वडगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.एन.तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात  आला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाकाhighwayमहामार्ग