शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील लाचखोरीवर विधानसभेत तारांकित, जिल्ह्यातील आमदारांचे मौन पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:04 IST

कोल्हापूर : सरपंच हत्या प्रकरण मोठ्या धाडसाने लावून धरल्याने संपूर्ण राज्याच्या काेनाकोपऱ्यात पोहोचलेले आमदार सुरेश धस यांनी कोल्हापूर जिल्हा ...

कोल्हापूर : सरपंच हत्या प्रकरण मोठ्या धाडसाने लावून धरल्याने संपूर्ण राज्याच्या काेनाकोपऱ्यात पोहोचलेले आमदार सुरेश धस यांनी कोल्हापूरजिल्हा परिषदेतील लाचखोरीवर चालू अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारले आहेत. वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या कक्षासमोरील स्वीय सहायक आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शिपायाने घेतलेल्या लाच प्रकरणाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. आमदार धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाशी संंबंधित माहिती घेऊन दोन्ही विभागातील अधिकारी मुंबईला गेले आहेत.जिल्हा परिषद वित्त विभागात फंड मॉनिटरिंग सिस्टीमचे अधिकाऱ्याचे लॉगिन आयडी वापरून स्वीय सहायक हा कक्षासमोरच ठेकेदारांकडून पैसे गोळा करीत होता. ‘लोकमत’ने ठेकेदारांकडून पैसे घेतानाच स्वीय सहायकाच्या फोटाेसह २१ मार्च २०२४ रोजी बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्याची उचलबांगडी केली. त्यासंबंधीचा प्रश्न आमदार धस यांनी विचारला आहे.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच ११ जुलै २०२४ ला पैसे घेतल्याचे प्रकरण उघड झाले. अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शिपायाने विकासकामांची निविदा मंजूर करून देण्यासाठी ठेकेदारांकडून १० हजार रुपये घेऊन कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात गेल्याचे व्हिडिओ क्लिप समोर आली. त्याची चौकशी झाली आहे का? संबंधितावर कोणती कारवाई केली? असा दुसरा प्रश्न आमदार धस यांनी विचारला आहे. या दोन्ही प्रकरणाच्या मलईचे कनेक्शन अधिकाऱ्यांपर्यंत असल्याने पैसे घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही. आता आमदार धस यांनी याकडे विधानसभेत तारांकित केल्याने कारवाई होणार का? यासंबंधीची उत्सुकता लागून राहिली आहे.

जिल्ह्यातील आमदारांचे मौन पण..जिल्हा परिषदेतील दोन्ही लाचखोरीची प्रकरणे प्रसिद्धी माध्यमातून ठळकपणे चव्हाट्यावर आली. त्याची दखल घेऊन बीड जिल्ह्यातील आमदार धस यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला. पण, यावर जिल्ह्यातील एकाही आमदारांनी आवाज उठवला नाही, हे विशेष आहे. दोन्ही प्रकरणे महायुतीच्या सरकारमधील आहेत. महायुतीचेच भाजपचे आमदार धस यांनी प्रश्न विचारल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदSuresh Dhasसुरेश धसvidhan sabhaविधानसभा