शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शहाजीबापू ट्रॅफिकमध्ये अडकले, 'एकदम ओक्के' म्हणत वाहनधारकांनी डिवचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 17:24 IST

शहाजी बापू यांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकल्याने हातकणंगले परिसरातील वाहनधारक आणि नागरिकानी त्यांच्यासमोर एकच गर्दी केली.

हातकणंगले : काय ती झाडी…काय त्यो डोंगार, ओक्केच म्हणारे आमदार शहाजी बापू पाटील कोल्हापूर-सांगली मार्गावर हातकणंगले जवळ चक्क वाहतूक कोंडीत अडकले. यावेळी आमदार शहाजीबापू दिसताच वाहनधारकांनी त्यांना उद्देशून काय तो सांगली- कोल्हापूर रस्ता, काय ते खड्डे, आणि काय ते ट्रॅफिक एकदम ओक्‍के असे म्हणत संताप व्यक्त केला.कोल्हापूर -सांगली  मार्गावरील खडयेमय रस्त्याच्या वाहतूक कोंडीत हातकणंगले जवळ आमदार शहाजी बापू पाटील अडकले. अर्धा तास त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. त्‍यांच्या गाड्यांचा ताफा पुढे सरकत नसल्याने त्यांनी गाडीतच डुलकी घेतली. यावेळी वाहनधारकानी त्यांना उद्देशून काय तो सांगली- कोल्हापूर रस्ता, काय ते खड्डे, आणि काय ते ट्रॅफिक एकदम ओक्‍के असा संताप व्यक्त केला.कोल्हापूर-सांगली राज्य मार्ग आहे की शेतीचा पाणंद रस्ता अशी स्थिती या मार्गाची झाली आहे. शिंदे गटाचे आ. शहाजी बापूंपाटील हे सांगली कडुन कोल्हापूरकडे येत असताना हातकणंगले बसस्टँड जवळ पडलेल्या रस्त्यावरील खडयामध्ये जाम झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकले. शहाजी बापू यांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकल्याने हातकणंगले परिसरातील वाहनधारक आणि नागरिकानी त्यांच्यासमोर एकच गर्दी केली. त्यांच्या सुरक्षा रक्षकाला ट्रफीक मधून मार्ग काढत त्यांना पुढे वाट करून दयायची वेळ आली. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग