शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

कृषी पंप वीज दरवाढीबाबत सतेज पाटलांनी विचारला जाब; ऊर्जामंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले..

By विश्वास पाटील | Updated: March 11, 2023 16:07 IST

शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य माणसांवर याचा बोजा पडणार

कोल्हापूर : कृषी पंपाच्या वीज बिलात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी त्या संदर्भात सभागृहात नियम ९३ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा उपस्थित केली.आमदार पाटील म्हणाले, महावितरणने ६७ हजार कोटींची वीज दरवाढ आयोगाकडे मागितली आहे. ती २.५५ पैसे प्रती युनिट आहे. साधारणपणे ११ व १४ टक्के वीज दरवाढ सांगितली जात असली तरी ती प्रत्यक्षात ३७ टक्के आहे. शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य माणसांवर याचा बोजा पडणार आहे. आयोगाची स्थापना झाल्यापासून एवढी वीज दरवाढ महावितरणने मागितली नव्हती. अनेक न्यायालयीन प्राधिकरणाचे निर्णय आहेत, कुठलीही दरवाढ दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसावी. मात्र, ती ३७ टक्के इतकी आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो, याचे भांडवल केले जाते. पण राज्यातील वीजचोरी, वीजगळती किती आहे याबाबत चर्चा होत नाही. देशात सर्वाधिक वीजदर महाराष्ट्रात आहे, हे दुर्दैवाने सांगावे लागते. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणार आणि वीज दरवाढीमुळे एक एप्रिलनंतर पुन्हा ते सरकार काढून घेणार, असे त्यांनी सरकारला सुनावले.ऊर्जामंत्री फडणवीस म्हणाले, वीजदरवाढीबद्दल जे मांडले जाते आहे, प्रत्यक्षात तसे नाही. ३७ टक्के वीज दरवाढ ही वस्तुस्थिती नाही. महावितरणने आयोगाकडे याचिकेद्वारे वीज दरवाढ मागितली हे खरे आहे. मात्र वीज दरवाढीचा आकडा मोठा दिसतो, याचे कारण पूर्वी एक-एक वर्षाची वीज दरवाढ मागितली जात होती. आता बहुवार्षिक दरवाढ मागणी करण्यात आली आहे.महावितरण जितकी वीज दरवाढ मागते तेवढी आयोग देत नाही. आयोग विविध भागधारक, ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेऊन मगच किती दरवाढ द्यायची, हा निर्णय घेते. आवश्यकता भासल्यास शासन मध्यस्थी करेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलelectricityवीजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस