शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आबिटकर मागे फिरा, अन्यथा...; संपर्कप्रमुख अरुण दुधवडकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 18:14 IST

आबिटकर यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. बंडखोरीमुळे सामान्य शिवसैनिकांची प्रतिक्रिया वाईट आहे.

आजरा : आमदार प्रकाश आबिटकर तुम्ही मागे फिरा,  खुल्या मनाने स्वीकारू. पण बंडखोरी केल्यास सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. असा इशारा शिवसेनाकोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला. ते आजऱ्यात शिवसैनिकांच्या भेटीवेळी बोलत होते.बंडखोरी केलेले आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. गुवाहाटीतही शिवसैनिक आहेत. आमदार प्रकाश आबीटकर यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांनी सांगावे. आम्ही त्यांना संरक्षणात तेथून आणू. आबीटकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आम्ही त्यांचे बंधू जिल्हा बँक संचालक अर्जुन आबीटकर यांचेकडे चौकशी केली. तोपर्यंत व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. आबिटकर यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. बंडखोरीमुळे सामान्य शिवसैनिकांची प्रतिक्रिया वाईट आहे.उद्धव ठाकरेंचे मन मोठेपक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन मोठे आहे. तुम्ही परत या. आमदार ही शिवसेनेची ताकद नसून सामान्य शिवसैनिक हीच खरी ताकद आहे. आर्थिक व्यवहार व ईडीची भीती दाखवून आमदारांना भाजपने बंडखोरी करायला लावली आहे असाही आरोप अरुण दुधवडकर यांनी केला.क्षीरसागर-इंगवले संघर्ष वैयक्तिककोल्हापुरातील माजी आमदार राजेश क्षीरसागर व शहर प्रमुख रवी इंगवले यांच्यातील संघर्ष हा वैयक्तिक आहे असेही अरुण दुधवडकर यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख युवराज पोवार, उप तालुका प्रमुख संजय येसादे, शहरप्रमुख ओंकार माद्याळकर, युवा सेना अधिकारी महेश पाटील, संदीप पाटील, सुरेश पाटील, रोहन गिरी  उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash abitkarप्रकाश आबिटकरShiv SenaशिवसेनाArun Dudhwadkarअरुण दुधवडकर Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ