शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: सासूमुळे वाटणी अन् सासूच वाटणीला; राधानगरी मतदारसंघातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 16:22 IST

नेते व्यासपीठावर; पण कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे काय?

दत्ता लोकरेसरवडे : विधानसभा, बिद्री साखर कारखान्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या ‘राधानगरी’ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र यावे लागले आहे. सासूसाठी वेगळो झालो; पण सासूच वाटणीला आली, अशी वेळ तेथील कार्यकर्त्यांवर आली असून नेते व्यासपीठावर आले; पण कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे काय? या प्रश्नाचे उत्तर ४ जूनलाच समजणार आहे.सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकायचा, आरोप-प्रत्यारोपाच्या माध्यमातून एकमेकांचे वस्त्रहरण करायचे, व्यक्तिगत टीकाटिप्पणीने हैराण करून सोडायचे आणि राज्यातील आघाडी व महायुतीच्या राजकारणामुळे पुन्हा एकत्र येण्याची वेळ स्थानिक कार्यकर्त्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषण पाटील व वीरेंद्र मंडलिक हे एकमेकांविरोधात लढले होते. यामध्ये मंडलिक यांना पराभव पत्कारावा लागला होता. शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व खासदार संजय मंडलिक तर ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील व प्रवीणसिंह पाटील यांच्यातील संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीत मुरगूडकर बंधू एकमेकांविरोधात लढले होते. अजून बिद्रीच्या निवडणुकीची बोटावरील शाई जायची आहे, तोपर्यंत हे सगळे नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत.तीच अवस्था भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, ‘गोकुळ’चे संचालक राजेंद्र मोरे यांच्यासह दिग्गजांची झाली आहे. विधानसभेला तर आमदार प्रकाश आबीटकर व के. पी. पाटील यांच्यात विधानसभा व बिद्रीला संघर्ष झाला. आता दोघेही खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. सासूसाठी वेगळो झालो आणि सासूच वाटणीला आली, असे म्हणण्याची वेळ दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.वरिष्ठ नेत्यांच्या दबावापोटी नेते इच्छा नसताना एकत्र असल्याचे दाखवत आहेत; पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनाचे काय, हा प्रश्न आहेच.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४K P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकर