शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

Kolhapur Politics: चंद्रदीप झळकले, आबिटकरांना वगळले; ‘गोकुळ’वरुन महायुतीत ‘नाट्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:22 IST

कोरेंनी वगळले, नरकेंनी १० कोटी मिळवले

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीवेळी तत्कालीन आमदार प्रकाश आबिटकर हे आपल्यासोबत यावेत, यासाठी त्यांना विनवणी करणाऱ्या नेत्यांनी चक्क आज होणाऱ्या पेट्रोल पंप उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांचे छायाचित्रच वगळले आहे. एकीकडे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते उद्घाटन करताना त्यांचे छायाचित्र छापताना आबिटकर यांचे नाव मात्र पालकमंत्री असूनही सन्मानीय उपस्थितीमध्ये खासदार, आमदार यांच्यासोबत घातले आहे. याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, यानिमित्ताने आमदार विनय कोरे यांच्या पन्हाळ्यावरील कार्यक्रमाचीही चर्चा रंगली आहे.‘गोकुळ’च्या प्रधान कार्यालयाशेजारी पेट्रोल पंप उभारण्यात आला असून, या निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि हार्वेस्टर मशीन हस्ते म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची नावे पहिल्या दोन ओळीत आहेत. त्याखाली गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन हे चंद्रदीप नरके यांच्या हस्ते होणार असून, त्या शेजारीच प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार शाहू छत्रपती यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तर पत्रिकेच्या तिसऱ्या पानावर खासदार, आमदार आणि माजी आमदारांची नावे सन्मानीय उपस्थितीमध्ये घालण्यात आली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर पालकमंत्री आबिटकर यांचे नाव घालण्यात आले आहे. ‘गोकुळ’चे नेतृत्व आमदार सतेज पाटील आणि मुश्रीफ करतात. मुश्रीफ हे जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते असताना महायुतीमधीलच पालकमंत्र्यांचे नाव सर्वात खाली आणि छायाचित्र वगळण्याची आणि यावर कहर म्हणजे महायुतीमधील आमदारांचे छायाचित्र प्रसिद्ध करायचे आणि पालकमंत्र्यांचे वगळायचे यातून कोणते नवीन राजकारण सुरू झाले आहे, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

कोरेंनी वगळले, नरकेंनी १० कोटी मिळवले‘गोकुळ’च्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनय कोरे यांनी ६ मार्च रोजी पन्हाळ्यावर घेतलेल्या कार्यक्रमाचीही चर्चा सुरू झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील काही गावे आमदार चंद्रदीप नरके यांच्या मतदारसंघात येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शौर्यस्मारक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नरके यांना कुठेच स्थान नव्हते.

वास्तविक हा कार्यक्रम नगरपरिषदेचा असल्याने त्यांचे नाव पत्रिकेत अपेक्षित होते. परंतु ते नसल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला वगळल्याने नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून पन्हाळ्यावरील शिवस्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. असे हे महायुतीमधील अंतर्गत शह, काटशह चर्चेत आले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकरMahayutiमहायुतीGokul Milkगोकुळ