आमदार आबिटकर यांचा कल विरोधी आघाडीकडेच; ‘गोकुळ’चे रणांगण : दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:10+5:302021-03-31T04:24:10+5:30

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत निर्णय घेतला नसला तरी, ...

MLA Abitkar's tendency is towards opposition; Battle of Gokul: A decision is likely to be taken in two days | आमदार आबिटकर यांचा कल विरोधी आघाडीकडेच; ‘गोकुळ’चे रणांगण : दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

आमदार आबिटकर यांचा कल विरोधी आघाडीकडेच; ‘गोकुळ’चे रणांगण : दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत निर्णय घेतला नसला तरी, त्यांचा कल विरोधी राजर्षी शाहू आघाडीकडे असल्याचे समजते. कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबतची चर्चा त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी केली असून दोन दिवसात त्याबाबतची उघड भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

आबिटकर गटाला दोन्ही आघाड्यांकडून पायघड्या घालण्यात आल्या आहेत. या गटाला मानणारा राधानगरी व भुदरगड तालुक्यात ठरावधारक वर्ग आहे. त्यामुळेही या गटाच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. आमदार आबिटकर यांच्यापुढे खासदार संजय मंडलिक की आमदार पी. एन. पाटील यांपैकी कुणासोबत जायचे, असे धर्मसंकट उभे राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आमदार पाटील यांची मदत झाली आहे. आबिटकर यांनी पहिली निवडणूक मंडलिक ब्रँडवर लढविली. त्यामुळे मंडलिक गटाशी त्यांची जवळीक जास्त आहे. त्यातही ते शिवसेनेचे आमदार आहेत. विरोधी आघाडी दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सहभागी आहे. पक्षीय बंधन, मंडलिक यांच्यासोबतची बांधिलकी, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबतची जवळीक याचा विचार करून ते विरोधी आघाडीसोबत राहतील असे चित्र आहे. त्यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी सत्तारूढ, तर काहींनी विरोधी गटासोबत जावे, असा आग्रह धरला आहे. आता चेंडू आमदारांच्या कोर्टात आहे. सत्तारूढ व विरोधी आघाडीतही त्यांना पारंपरिक विरोधकासोबत जावे लागणार आहे.

आमदार गटाकडून दोन जागांची मागणी झाली असून त्यातून नंदकुमार ढेंगे व अभिजित तायशेटे यांच्यासाठी आग्रह असल्याचे सांगण्यात आले. भुदरगडमधून नांदेकर गटाकडूनही मागणी आली आहे. विरोधी आघाडीत नेत्यांची गर्दी झाल्याने दोन जागा कशा मिळणार, हा प्रश्न आहेच. त्यातून मार्ग म्हणून जिल्हा परिषदेत या गटाच्या वंदना जाधव यांना सत्तेत संधी द्यावी, असाही प्रस्ताव आला आहे.

Web Title: MLA Abitkar's tendency is towards opposition; Battle of Gokul: A decision is likely to be taken in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.