शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोल्हापुरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; अनेक ठिकाणी निदर्शने, रस्ता रोको 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 3:50 PM

भारत बंदचा भाग म्हणून बिंदू चौकात झालेल्या सभेत संपतराव पवार म्हणाले, "आजचा बंद श्रमिकांनी आपल्यातील सर्व भेदभाव विसरून चांगल्या प्रकारे यशस्वी केला. या एकजुटीने भाजप सोडून इतर सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. त्यांनी ही दिशा ओळखून गोरगरीब जनतेसाठी पुढील वाटचाल केली पाहिजे."

कोल्हापूर: "भारत बंदसोबत शेतकरी-कामगारांची लढाई संपलेली नाही, ती खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. आजच्या बंदला जनतेने मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने धन्यवाद देतो," असे मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा निमंत्रक माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी म्हटले आहे.

आजच्या बंदला कोल्हापूर शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवून जनतेने प्रतिसाद दिला. इस्पुर्ली, हळदी, बीड फाटा, बीडशेड, कळंबा, सांगरूळ फाटा, कुंभी कासारी, कळे, राधानगरी, आमजाई व्हरवडे, मुदाळ तिट्टा, मुरगूड, भोगावती व्यापार पेठ, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, हलकर्णी फाटा, शिरोली, हातकणंगले, बांबवडे, इचलकरंजी, कुरूंदवाड, जयसिंगपूर, सांगरूळ, उचगाव, रेंदाळ, शिरोळ, चंदगड आदी प्रमुख ठिकाणी निदर्शने, रस्ता रोको करून बंद पाळण्यात आला.

भारत बंदचा भाग म्हणून बिंदू चौकात झालेल्या सभेत संपतराव पवार म्हणाले, "आजचा बंद श्रमिकांनी आपल्यातील सर्व भेदभाव विसरून चांगल्या प्रकारे यशस्वी केला. या एकजुटीने भाजप सोडून इतर सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. त्यांनी ही दिशा ओळखून गोरगरीब जनतेसाठी पुढील वाटचाल केली पाहिजे."

उदय नारकर म्हणाले, "आजच्या बंदने मोदी आणि भाजप सरकारला शेतकरी कामगार एकजूट हाच खरा पर्याय आहे, या एकजुटीतूनच भाजपला सत्तेवरून दूर करणारी शक्ती उभी रहात आहे."

अतुल दिघे म्हणाले, "शेतकरी वाचला तरच लोकशाही वाचेल, आणि कामगार जगला तरच देश जगेल, हे आजच्या बंदने दाखवून दिले आहे."

जनता दलाचे रवी जाधव म्हणाले, "तीन काळे शेती कायदे आणि कामगारविरोधी चार संहिता रद्द होत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही."

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल पिवडे म्हणाल्या, "या लढ्यात महिला आघाडीवर राहतील. त्या महागाई विरोधात सतत लढत राहतील.

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार,  काँग्रेसचे गुलाबराव घोरपडे, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, प्रा. डी. एन. पाटील, सुटाचे कार्यवाह डॉ. टी. एस. पाटील, सीटूचे विवेक गोडसे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत, मावळा युवक ग्रूपचे उमेश पोवार,  बागल विद्यापीठाचे अशोकराव साळोखे यांनी मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.

यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आयटकचे नेते दिलीप पोवार, किसान सभेचे राज्य सचिव  नामदेव गावडे, शेकापचे बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, सरदार पाटील, रिपब्लिकन पक्ष (कवाडे) चे जिल्हा अध्यक्ष दगडू भास्कर, जनता दलाचे राज्य चिटणीस शिवाजीराव परूळेकर, वसंतराव पाटील, सीटूचे  चंद्रकांत यादव, माकपचे शंकर काटाळे, मल्हार सेनेचे बबन रानगे, शेकाप महिला आघाडीच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष वैशाली सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाहीर रंगराव पाटील यांच्या शाहिरी पोवाड्यांनी झाली. प्रास्ताविक शेकापचे शहर चिटणीस बाबुराव कदम यांनी केले.आयटकचे बाळासाहेब बर्गे यांनी आभार मानले.  सूत्रसंचालन  संभाजीराव जगदाळे यांनी केले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmers Protestशेतकरी आंदोलनkolhapurकोल्हापूर