शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर तपासाची फाइल पुन्हा उघडली, कॉल डिटेल्सपासून जबाबांपर्यंत पुनर्तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:51 IST

तपासातील त्रुटींचा आढावा 

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील पाटगावचे बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या तपासाची फाइल एसआयटीकडून पुन्हा उघडण्यात आली. एसआयटी प्रमुख पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी तपासाची सूत्रे स्वीकारून अधिकाऱ्यांना कामांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. त्यानुसार आधीच्या तपासातील त्रुटींचा आढावा घेऊन पिळणकर यांच्या कॉल डिटेल्सपासून ते नातेवाइकांच्या जबाबांचाही पुनर्तपास केला जात आहे.पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे ७ जानेवारी २०२६ रोजी गावातून बेपत्ता झाले. फिर्याद दाखल होताच भुदरगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांचा शोध घेतला. मात्र, बेपत्ता होऊन दोन महिने उलटूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाईक आणि काही सामाजिक संघटनांच्या दबावामुळे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी पिळणकरांच्या तपासासाठी एसआयटी तयार केली. एसआयटीचे प्रमुख उपअधीक्षक इंगवले यांनी भुदरगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून आजवर झालेल्या तपासाचा आढावा घेतला. तपासातील त्रुटींवर चर्चा करण्यात आली. पिळणकर आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉल डिटेल्स तपासणे. संबंधित व्यक्तींची चौकशी करणे. त्यांचे नव्याने जबाब नोंदवणे. पिळणकरांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढणे अशा विविध कामांची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे वाटून देण्यात आली आहे.पुन्हा पुराव्यांची जुळवाजुळवपाटगाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. ग्रामस्थ पोलिसांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. पिळणकरांचा मोबाइल अद्याप सापडलेला नाही. पिळणकर बेपत्ता झालेल्या ठिकाणीही काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे पुन्हा पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. घटना घडून अडीच महिने उलटल्यामुळे तपासात काही अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक घेणार आढावातपासातील प्रगतीची माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना दिले आहेत. लवकरच तपासातील प्राथमिक माहितीचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तपासाचा आढावा घेणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Missing Ex-Sarpanch Case Reopened: Kolhapur Police Re-examining Evidence

Web Summary : Kolhapur police reopen the case of missing ex-Sarpanch Mahesh Pilankar. SIT re-examines call details, statements due to lack of leads. Authorities face challenges due to time elapsed and uncooperative locals.