शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Kolhapur Crime: भानामती करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भोंदू बाबासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:44 IST

कोडोली : भानामती करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सांगरुळ येथील भोंदू बाबा राजू उर्फ राजाराम भिकाजी तावडे (वय ४८ ...

कोडोली : भानामती करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सांगरुळ येथील भोंदू बाबा राजू उर्फ राजाराम भिकाजी तावडे (वय ४८ ) या मांत्रिकाला आणि त्याला सहकार्य करणारा वाहन चालक मनोज सावंत (रा. भादोले, ता. हातकणंगले ) तसेच सुप्रिया हिम्मत पोवार ( रा.सातवे, ता.पन्हाळा) यांना कोडोली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे अधिक तपास करत आहेत.अधिक माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी हातकणंगले तालुक्यातील आहे. सातवे येथील आळोबानाथ महिला शेळी-मेंढी पालन संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पोवार यांची पीडितेच्या आईशी ओळख झाली. त्यातून तिला अर्थसाहाय्य करण्याचे आमिष दाखवत पीडित मुलीला संस्थेत नोकरीवर ठेवले होते. पीडित मुलगी कामावर रुजू झाल्यानंतर आरोपी पोवार हिने सांगरूळ येथील भोंदू बाबा राजू तावडे याला बोलावून घेऊन पीडितेची भेट घालून दिली. पीडित मुलीस तिघांनी विश्वासात घेऊन भोंदू बाबा मंत्राच्या साहाय्याने जादू टोणा, पूजा करतात. यातून चांगले होईल असे आमिष दाखवून तिला अघोरी पूजेला बसवले होते. भोंदू बाबा राजू तावडे याने चार महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार करायला सुरुवात केली होती. पीडितेने घडलेली घटना आईला सांगितल्यावर या दोघींनी ह्यूमन राईटस संस्थेच्या मदतीने आरोपी विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल झाला. कोडोली पोलिसांनी संशयित तिघांना अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस