शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: फेसबुकवरून जुळले सुत; लग्नाची तयारी सुरू झाली, पोलिस दारात येताच घरच्यांची बोबडी वळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 16:06 IST

लग्नाआधीच वरात पोलीस ठाण्याच्या दारात गेल्याने चर्चेला उधाण

कोपार्डे : एक वर्षापूर्वी फेसबुकवर झाली ओळख. ओळखीचे झाले प्रेमात रूपांतर.आणि पनवेलच्या युवतीने गाठले थेट कोपार्डे. मुलांच्या घरच्यांनीही लग्नाची तयारी सुरू झाली. पण मुलीची आई पनवेल पोलिसांसह करवीर पोलिसांना घेऊन कोपार्डे येथे मुलांच्या दारात हजर राहताच घरच्यांची बोबडी वळली.ही कथा नाही तर सत्य वस्तुस्थिती आहे. घडले ते असे एक वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून पनवेल(मुंबई)येथील १६ वर्षीय मुलीचे फेसबुकच्या माध्यमातून कोपार्डे येथील तरूणाशी ओळख झाली. गेली वर्षभर दोघांची समोरा समोर भेट झाली नसतानाही प्रेमाचे अंकुर मात्र फेसबुकच्या माध्यमातून उमलू लागले. मुलीने मागचापुढचा विचार न करता कोपार्डे येथील तरुणाचे घर गाठले.आठ दिवसापूर्वी ती कोपार्डे येथे आली होती अशिक्षित आईवडिलांनी मुलांच्या प्रेमा खातर लग्नाची तयारी सुरू केली.दारात मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गावात या फेसबुक प्रेमाची चर्चा रंगू लागली.आतुरतेने ग्रामस्थांत प्रत्येक कट्ट्यावर चर्चा सुरू झाली. दोनच दिवसात लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला.तो पर्यंत रविवारी दुपारी मुलीची आई पनवेल व करवीर पोलिसांना घेऊन या तरुणाच्या दारात आल्यानंतर घटनेचे गांभीर्य समोर आले.मुलगा-मुलगी दोघेही अल्पवयीन. मुलगीने आपणहून कोपार्डे येथे आल्याचे सांगितले तरी तरूण व त्यांचे आईवडील कायद्याच्या कचाट्यात अडकणार असल्याचे समजताच त्यांची बोबडीच वळली. गावातील लोकांनी आईवडील अशिक्षित व गरीब आहेत अशी विनवणी करण्यास सुरू केली. पण मुलगा व मुलगीला हजर करा त्या शिवाय पोलीस बोलायला तयार होईनात.मुलगीला हजर केले आणि मुलग्याला घेऊन येतो असे सांगताच पोलिसांनी खाक्या दाखवत मुलग्याच्या वडीलांना ताब्यात घेऊन थेट करवीर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यामुळे या फेसबुक प्रेमी विवाहाची लग्नाआधीच वरात पालकांच्यासह पोलीस ठाण्याच्या दारात वरात गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. चौकशी अंती मुलगीला पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस