मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाकडे २० व्हेंटिलेटर सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:49+5:302021-06-09T04:30:49+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शिवसेनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हा प्रशासनाला २० व्हेंटिलेटर ...

Minister Uday Samant handed over 20 ventilators to the district administration | मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाकडे २० व्हेंटिलेटर सुपूर्द

मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाकडे २० व्हेंटिलेटर सुपूर्द

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शिवसेनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हा प्रशासनाला २० व्हेंटिलेटर देण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे हे व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले.

कोरोनाची लाट असेपर्यंत शहरातील सीपीआर, इचलकरंजीतील आय.जी.एम, गडहिंग्लज येथील एस.डी.एच रुग्णालयांमध्ये त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत याचा वापर करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे. अशा परिस्थितीत या २० व्हेंटिलेटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे रुग्ण बरे होऊन जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढण्यास मदत होणार आहे.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर, संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, अजित नरके यांच्यासह सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी सेना पदाधिकारी मनजित माने व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावतीने मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पीपीई किटचे वितरण करण्यात आले. हे पीपीई किट गरजूंना देण्यात येणार असल्याची माहिती माने यांनी दिली.

---

फोटो नं ०८०६२०२१-कोल-व्हेंटिलेटर

ओळ : कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे २० व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. या वेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, विजय देवणे, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, संजय पवार. मुरलीधर जाधव, शिवाजीराव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

--

फोटो नं ०८०६२०२१-कोल-पीपीई कीट

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आरोग्य व्यवस्थेसाठी पीपीई किटचे वितरण करण्यात आले.

---

Web Title: Minister Uday Samant handed over 20 ventilators to the district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.