मंत्री हसन मुश्रीफ देणार देवेंद्र फडणवीस यांना मौन व अध्यात्माची पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 07:09 PM2020-05-29T19:09:55+5:302020-05-29T19:45:50+5:30

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मौनंम सर्वार्थ साधनम्, मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन पुस्तके भेट म्हणून पाठविणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ बोलत होते.

Minister Hasan Mushrif will give books on silence and spirituality to Devendra Fadnavis | मंत्री हसन मुश्रीफ देणार देवेंद्र फडणवीस यांना मौन व अध्यात्माची पुस्तके

मंत्री हसन मुश्रीफ देणार देवेंद्र फडणवीस यांना मौन व अध्यात्माची पुस्तके

googlenewsNext
ठळक मुद्देमंत्री हसन मुश्रीफ देणार देवेंद्र फडणवीस यांना मौन व अध्यात्माची पुस्तकेगडहिंग्लजमध्ये वक्तव्य: थोडे शांत रहा आणि सरकारचे काम बघत बसा

गडहिंग्लज : महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मौनंम सर्वार्थ साधनम्, मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन पुस्तके भेट म्हणून पाठविणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ बोलत होते.

यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले , माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते सिनिअर झालेले आहेत. परंतु झालंय काय की गेल्या पाच वर्षात ते मुख्यमंत्री असल्यामुळे हम करे सो कायदा असा त्यांचा कारभार होता. त्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना फोडून त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतले. स्वतःच्या पक्षातीलच अनेकांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला, असे अनेक कार्यक्रम केले. परंतु, अशा काळात ते ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्याचं मला आश्चर्यच वाटतंय.

मुख्यमंत्रीपदाच्या त्या पाच वर्षांमध्ये त्यांना नाही म्हणणारा कोणी सापडलाच नाही, त्यामुळे आता त्याना हे सगळं सहन होईना झालंय.  मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाचं काम अतिशय चांगलं सुरू आहे. त्यामुळे फडणवीस यांनी थोडं शांत राहावं आणि सरकार काय करतय बघत राहावं.

महाराष्ट्रात करोनाच्या रूपाने महाभयंकर संकट उभे आहे. अशातच विरोधकांकडून यातही राजकारण सुरू आहे . राजकारण आरोप-प्रत्यारोपांनी टीका-टिप्पणी करत बसण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा सहकार्य करा, मिळून काम करूया.

 

Web Title: Minister Hasan Mushrif will give books on silence and spirituality to Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.