कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या युतीने एकहाती सत्ता मिळवली. नगराध्यक्षपदासह सर्व 22 जागा जिंकत शिंदेसेनेचे नेते संजय मंडलिक यांचा धुव्वा उडवला. निकालानंतर मुश्रीफ-राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.नगराध्यक्षपद पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सविता प्रताप माने या 7590 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 14789 मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार युगंधरा महेश घाटगे यांना 7199 मते मिळाली. राष्ट्रीय काँगेस पक्षाच्या गायत्री चित्रगुप्त प्रभावळकर यांना - 671, शिवसेना उबाठा गटाच्या शारदा धनाजी नागराळे यांना -185 मते तर अपक्ष उमेदवार राणी अरुण सोनुले यांना 195 मते मिळाली. नोटाला 194 इतकी मते मिळाली.
वाचा- निकालापुर्वीच मंत्री मुश्रीफ-घाटगे समर्थकांनी लावले विजयाचे फलक, उद्धव ठाकरे गटाची तक्रार कट्टर विरोधी असलेले मंत्री मुश्रीफ-समरजित घाटगे यांची युती झाल्याने कागलच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. नगरसेवकपदाच्या 23 जागापैकी 14 राष्ट्रवादीचे तर शाहु आघाडीचे 09 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एक जागा बिनविरोध झाल्याने 22 जागासाठी मतमोजणी आज झाली. पहिल्या फेरी निहाय मतांची आघाडी मिळत गेली अन् मुश्रीफ-राजे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सकाळपासूनच जल्लोष सुरु होता. फटाक्यांची अताषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. मंत्री हसन मुश्रीफ समरजित घाटगे आणि गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी गैबी चौकात सुरु असलेल्या या जल्लोषात भाग घेत कागलच्या जनतेचे आभार मानले.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/858050663620220/}}}}
Web Summary : In Kagal, the Mushrif-Ghatge alliance secured a landslide victory in the municipal elections, winning all 22 seats. NCP's Savita Mane won the mayoral post by a significant margin, defeating Shiv Sena's Yugandhara Ghatge. Celebrations erupted among the winning alliance's supporters.
Web Summary : कागल में, मुश्रीफ-घाटगे गठबंधन ने नगरपालिका चुनावों में भारी जीत हासिल की, सभी 22 सीटें जीतीं। राकांपा की सविता माने ने शिवसेना की युगंधरा घाटगे को हराकर महापौर पद जीता। विजयी गठबंधन के समर्थकों में जश्न मनाया गया।