मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 03:29 PM2024-04-23T15:29:50+5:302024-04-23T15:31:48+5:30

दुर्वा दळवी कोल्हापूर : कोल्हापुरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही ...

Minister Hasan Mushrif offered a silver mace to the village deity of Lingnoor Dumala on Hanuman Jayanti | मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण

मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण

दुर्वा दळवी

कोल्हापूर: कोल्हापुरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधील लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताचे दर्शन घेतले. तसेच देवाला खास चांदीची गदा अर्पण केली.

जिल्ह्यात सद्या लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र प्रचाराचे वारे वाहू लागले आहे. राजकीय नेत्यांकडून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आज हनुमान जयंती असल्याने शहरात तसेच जिल्ह्यात सर्वत्र कार्यक्रमाची रेलचेल सुरु आहे. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत. 

मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधील लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताचे दर्शन घेतले. यावेळी मुश्रीफांच्या हस्ते हनुमानाची पूजा आणि आरती करण्यात आली. तसेच देवाला खास चांदीची गदा मुश्रीफांनी अर्पण केली. दरम्यान ग्रामस्थांनी काढलेल्या दिंडीत सहभागी होत हनुमानाच्या नामघोषात तल्लीन झाले.

Web Title: Minister Hasan Mushrif offered a silver mace to the village deity of Lingnoor Dumala on Hanuman Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.