शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री मुश्रीफ-अजय तावरे यांचे लागेबांधे; रवींद्र धंगेकर यांचा आरोप 

By राजाराम लोंढे | Updated: May 31, 2024 15:51 IST

'पुरावे नष्ट करण्याची भीती'

कोल्हापूर : हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांची माफीच का? त्यांच्या पायावर लोटांगण घालण्यास तयार आहोत, फक्त त्यांनी पुण्यातील ‘पब’ संस्कृती हद्दपार करावी. ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्याबद्दल अनेक तक्रारी येऊनही मंत्री मुश्रीफ यांनी त्यांना पाठीशी घातले. डॉ. तावरे व मुश्रीफ यांचे लागेबंधे असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.आमदार धंगेकर हे शुक्रवारी कोल्हापुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार धंगेकर म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, येथे देशभरातून विद्यार्थी शिकायला येतात; पण त्यांना चुकीच्या मार्गाला लावण्याचे काम काही यंत्रणा करीत असताना राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा शेवट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझं पुणे सुरक्षित नसेल तर आमदार, खासदारकीचे मुकुट मला काय करायचे? या प्रकरणात मला धमक्याही दिल्या आहेत. हसन मुश्रीफ यांनी तर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मी पुणेकर आहे, कोणाला घाबरत नाही. त्यांची माफीच का? त्यांच्या पायावर लोटांगण घालतो, त्यांनी पुण्यातील ‘पब’ संस्कृती हद्दपार करावी. मुळात मंत्री मुश्रीफ यांनाही या गोष्टी पटलेल्या नाहीत; पण ते सरकारसोबत असल्याने नाइलाज आहे. वडिलांसारख्या शरद पवार यांना मंत्री मुश्रीफ सोडून गेले. त्यांनी मला दम देऊ नये, असा इशारा देत एवढेच त्यांना वाटत असेल तर हे प्रकरण जलद न्यायालयात न्यावे, असेही त्यांनी सांगितले.

पुरावे नष्ट करण्याची भीतीससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे हे सरकारविरोधात लढून ‘मॅट’मधून आले होते. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्या ठिकाणी आपल्या मर्जीतील अधिकारी नेमून पुरावे नष्ट करण्याची भीती आम्हाला वाटत असल्याचे आमदार धंगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलravindra dhangekarरविंद्र धंगेकरHasan Mushrifहसन मुश्रीफ