शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने आता सत्तेचे नाव काढायचे नाही, मंत्री हसन मुश्रीफांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 11:48 IST

सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारचे काम सुरू असल्याने, भाजपने पुढच्या निवडणुकीत सत्तेचे नाव काढायचे नाही

कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या धर्तीवर शेतमजूर, ड्रायव्हर, यंत्रमाग कामगारांसह ३६ कल्याणकारी मंडळाची स्थापना लवकरच करणार आहे. राज्यातील ४ कोटी असंघटित मजुरांना संरक्षित करत असतानाच, त्यांच्या जीवनात स्थैर्य आणणार असून, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारचे काम सुरू असल्याने, भाजपने पुढच्या निवडणुकीत सत्तेचे नाव काढायचे नाही, असा विश्वास ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व दिशा फाउंडेशनच्या वतीने सोमवारी शाहू मार्केट यार्ड येथे बांधकाम कामगारांची नोंदणी व लाभ वाटप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के.पी. पाटील होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, बांधकाम मंडळाकडे १३ हजार कोटी शिल्लक असून, त्याचे व्याज व महिन्याला जमा होणारे २५० कोटीही खर्च होत नाहीत, ही शोकांतिका असून, बांधकामांकडून जमा होणाऱ्या उपकराची तपासणी करणार आहे. गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केले. शेतमजूर, ड्रायव्हर, यंत्रमाग कामगारांसह ३६ प्रकारच्या मंडळाची स्थापना करणार असून, सत्तेचे सोपान हातात आल्यानंतर गोरगरीब माणसाचे कोटकल्याण कसे करता येते, हेच आम्ही दाखवून दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.कामगार विभागाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम यांनी प्रास्ताविक केले. ‘दिशा’ फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.अंजली बोऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. पात्र लाभार्थ्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, युवराज पाटील, राजेश लाटकर, सूर्यकांत पाटील, डी.जी. भास्कर, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते.

अंजली बोऱ्हाडे यांच्या कामांचे कौतुकअसंघटित कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम बांधकाम मंडळ करत आहे, त्यामध्ये ‘दिशा’ फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला, याबद्दल अंजली बोऱ्हाडे यांचे कौतुक मंत्री मुश्रीफ यांनी केले.

मंडळांसाठी असा करणार सेस गोळाशेतमजूर - राज्यात १ कोटी १० लाख शेतमजूर असून, मंडळासाठी बाजार समितीवर उपकर बसविणार, त्याचबरोबर खते, बियाणे, शेती औजारे, ठिबक साहित्य आदी कंपन्यांच्या उलाढालीवर अर्धा टक्का मंडळासाठी घेणार.ड्रायव्हर - मोटारसायकलीपासून ट्रक खरेदीपर्यंत विशेष कर लावणार, त्याचबरोबर डिझेल, पेट्रोलवरही उपकर लावणार आहे.यंत्रमाग- सूतगिरणींनी खरेदी केलेल्या सुतावर प्रतिकिलो १ रुपया मंडळाकडे जमा करावा लागणार.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपा