शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:41 IST

कोल्हापूर : ‘ गोकुळ’चा मी नेता आहे, माझा फोन तुम्ही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात. ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’चा मी नेता आहे, माझा फोन तुम्ही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात. अशा शब्दात गवसे (ता. चंदगड) येथे एका लग्न समारंभात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना रविवारी सुनावले.मंत्री मुश्रीफ यांचे स्वीय सहायक सिकंदर शानेदिवाण यांच्या कन्येचे लग्न गवसे येथे रविवारी होते. त्यासाठी मुश्रीफ यांच्यासह अध्यक्ष डोंगळे, संघाचे चार-पाच संचालक उपस्थित होते. लग्नाच्या अगोदर मंत्री मुश्रीफ स्वागतासाठी थांबले असता, तिथे अरुण डोंगळे समोर आले. यावेळी मुश्रीफ यांना राग अनावर झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

वाचा- राजीनामा नव्हे; नवीन अध्यक्ष कोण, हेच महत्त्वाचे - अरुण डोंगळे

‘गोकुळ’चा नेता मी आहे, माझा फोनही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात’, अशा शब्दात सर्वांच्या समोर सुनावले. लग्नाची घाई गडबड सुरू असल्याने कोणाच्या हे लक्षात आले नाही.लग्नानंतर मंत्री मुश्रीफ तडक चंदगड शासकीय विश्रामगृहात गेले. तिथे अध्यक्ष डोंगळे यांच्यासह काही संचालक गेले. सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. यामध्ये मंत्री मुश्रीफ यांनी पुन्हा डोंगळे यांना झापले. विमानतळावर तुम्ही प्रसारमाध्यमांशी ज्या पद्धतीने बोलला ते चुकीचे होते. कशासाठी हे सगळे केले? तुम्हाला दिलेला शब्द आम्ही पाळला होता, तुम्ही न बोलता राजीनामा देणे अपेक्षित होते. कोणत्याही नेत्याने सांगितलेले नाही, तुम्हालाच राजीनामा द्यायचा नव्हता, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दोन दिवसात राजीनामा देतो?मला वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे ही भूमिका घेतली, मला समजून घ्यावे. दोन दिवसात राजीनामा देतो, असे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळHasan Mushrifहसन मुश्रीफ