शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

..तर उद्धव ठाकरेंवर अशी वेळ आली नसती, मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला

By संताजी मिठारी | Updated: August 30, 2022 18:13 IST

त्यामुळे आमच्या लोकसभा प्रवासावर त्यांनी हरकत घेण्याची गरज नाही

कोल्हापूर : प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. उद्धव ठाकरेंही तेच प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे जर यापूर्वी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आज, मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.शिवसेनेतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ठाणे, मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. त्यातून मुख्यमंत्री शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न आहे का? अशी विचारणा मंत्री पाटील यांना केली असता ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. त्यानुसार त्यांनी केले असेल. त्यामुळे आमच्या लोकसभा प्रवासावर त्यांनी हरकत घेण्याची गरज नाही. असा प्रवास आणि लक्ष केंद्रीत जर, उद्धव ठाकरे यांनी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे ध्येयसन २०२४ मध्ये लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे ध्येय भाजपचे आहे. ३०३ जागा कायम राखत आणखी १०० जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघासाठी १६ केंद्रीय मंत्री ठरले असून त्यांनी तीन दिवसांचा प्रवास करायचा आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बारामतीमध्ये जाणार आहेत. त्यांची पूर्वतयारी करण्यासाठी बावनकुळे जातील...त्याचा फायदा शिंदे गटातील खासदारांना१६ पैकी १२ खासदार हे शिवसेनेचे होते. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झाले आहेत. त्याठिकाणी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा त्यांना फायदा होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. एखादी जबाबदारी आल्यानंतर आपण समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटतो. त्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी आल्याने ते सर्वांना भेटत आहेत. त्याअंतर्गत राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना