शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

शरद पवारांच्या बालेकिल्याच्या भाजपकडून ठिकऱ्या, धूळधाण; मंत्री चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:47 IST

कितीही काळी जादू करू देत, पाच वर्षे मजबूत

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक महायुतीचे आमदार निवडून आल्याने शरद पवार, काँग्रेस, शेकापच्या बालेकिल्यांची ठिकऱ्या, ठिकऱ्या उडून धूळधाण झाली आहे, अशी बोचरी टीका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली.भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील संघटन पर्व कार्यशाळेत ते बोलत होते. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यशाळा झाली.मंत्री पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण विभागात भाजपचे संघटन चांगले झाले आहे. संघटन देवाऱ्यात पुजण्यासाठी नाही तर निवडणूूक जिंकण्यासाठी वापर केला पाहिजे. मजबूत संघटनेमुळेच भाजपला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात चांगले यश मिळाले आहे. म्हणून विशेष कार्यकारी अधिकारी पदे भाजपच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त दिली.जिल्ह्यात २९ शासकीय समित्या, तर राज्यात महामंडळावर निवडी आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या अशासकीय सदस्य निवडणुकीतही कार्यकर्त्यांना संधी मिळेल. कै. सुभाष वोरा यांना आम्ही अंथरुणात खिळून असतानाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सदस्य करून जुन्या कार्यकर्त्यांची दखल पक्ष घेतो असा संदेश दिला होता. अशाच पद्धतीने यापुढेही पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना शोधून पदे द्या.

कितीही काळी जादू करू देत, पाच वर्षे मजबूतसरकारवर कितीही काळी जादू करू दे. भाजपचे तब्बल १३७ आमदार आहेत. त्यामुळे पाच वर्षे सरकार मजबूत राहील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी कार्यशाळेत व्यक्त केला.

भाजपकडून लढणाऱ्यांनाच जास्त निधी..मंत्री पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधील निधी आधीच्या पालकमंत्र्यांनी घासून, पुसून स्वच्छ केला आहे. एक एप्रिलनंतर भरीव निधी मिळेल. नवीन निधीतील सर्वांत जास्त निधी आगामी काळातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून लढू इच्छिणाऱ्यांना द्यावा.

जिल्हा रिकामा होईल..जिल्हयातील इतर पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांची यादी खासदार धनंजय महाडिक यांनी माझ्याकडे दिली. ती यादी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंजूर करून घेतली आहे. आगामी काळात या सर्वांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर जिल्हा रिकामा होईल, असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला.

त्यांना कळेल अशा भाषेत..माझ्या कोथरूड मतदारसंघात कमी सभासद नोंदणी केलेल्या कार्यकर्त्यांना मी स्वत: संपर्क साधून त्यांना कळेल अशा भाषेत समजावणार आहे. सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा आणि मगच माझ्या घरी चहा पिण्यासाठी या, असेही त्यांना सुनावणार आहे, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस