शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक : ठाकरे यांचे दोन शब्दांचे ‘उत्तर’; क्षीरसागर यांचा लढण्यासाठी आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 12:44 IST

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त

कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहर शिवसेनेचा गड आहे. दोन अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेला लोकांनी मतदान केले आहे. म्हणूनच आपल्यासाठी कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे. आगामी पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी, असा आमचा आग्रह आहे.पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवा,’ अशी आळवणी शिवसेनेच्या माजी आमदारांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोर केली. मंत्री ठाकरे यांनी सर्वांचा आग्रह तसेच भावना जाणून घेतल्या खऱ्या; पण कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. “साहेबांशी मी बोलतो,” एवढेच दोन शब्दांचे उत्तर त्यांनी दिले.पर्यटनमंत्री ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या शहर कार्यालयास भेट देऊन तेथे पदाधिकारी, माजी आमदार यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी गप्पा मारताना माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये होऊ घातलेल्या पाेटनिवडणुकीचा विषय उपस्थित केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहर शिवसेनेचा गड असल्याचे तसेच तो आपल्याकडेच पाहिजे, असे सांगितले.काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली आहे. तिथे महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार का? याबद्दल उत्सुकता आहे. शिवसेनेला विशेषत: क्षीरसागर यांना या मतदारसंघात मैत्रीपूूर्ण लढत व्हावी, असे वाटते. त्यांनी त्यासाठी जोरदार तयारीही केली आहे. पक्षनेतृत्वाकडून परवानगी मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्री ठाकरे यांच्या या दौऱ्यालाही महत्त्व होते. परंतु त्यांनी उमेदवारीबाबत फारसे ठोस असे आश्वासन दिले नाही.आमच्या भावना पोहोचवा

  • दोन निवडणुकींत झालेला पराभव वगळता १९९० पासून शिवसेनेचे आमदार विजयी होत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेचे आमदार पाहिजे आहेत.
  • आम्ही सर्व जण एकदिलाने येणारी निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहोत. त्यामुळे आमच्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवा. त्यांना आमचा आग्रह असल्याचे सांगा, असे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.
  • माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील यांनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर