शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौकात मिनी बसची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:48 IST

Crimenews Police Kolhapur- मिनी बसने दुचाकीला पाठीमागून किरकोळ धडक दिली. तशी अज्ञाताने मीनी बसच्या काचा फोडल्या, गोंधळ उडाला, हे तोडफोडीचे कृत्य दुचाकीचालकानेच केल्याचा गैरसमज होऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली, हा प्रकार मंगळवारी दुपारी सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौकात घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौकात मिनी बसची तोडफोडगैरसमजातून दुचाकीचालकास मारहाण : वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : मिनी बसने दुचाकीला पाठीमागून किरकोळ धडक दिली. तशी अज्ञाताने मीनी बसच्या काचा फोडल्या, गोंधळ उडाला, हे तोडफोडीचे कृत्य दुचाकीचालकानेच केल्याचा गैरसमज होऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली, हा प्रकार मंगळवारी दुपारी सावित्रीबाई फुले हॉस्पीटल चौकात घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने सुमारे पाऊण तास परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी मिनीबस यादवनगर परिसरात काही प्रवाशांना सोडून सुभाषरोड मार्गे सावित्रीबाई हॉस्पीटल चौकातून पुढे जात होती. याचवेळी त्या मीनी बसची पुढील एका दुचाकीला किरकोळ धडक लागली.

या धडकेत दुचाकीची नंबर प्लेट तुटली. त्याचवेळी रस्त्यावरील एका अज्ञाताने दुचाकीला धडक बसल्याचे निमीत्त पुढे करुन मीनी बसची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. नागरीक मोठ्या प्रमाणावर जमा झाले. त्यावेळी ही तोडफोड संबधीत दुचाकीचालकानेच केली, या गैरसमजूतीतून नागरीकांनी त्या दुचाकीचालकाना बेदम मारहाण केली.

नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. पोलीसही तातडीने घटनास्थळी धावले, त्यांनी नागरीकांच्या मारहाणीतून दुचाकीचालकाची सुटका केली. त्यामुळे तणाव निवळला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर