साखर व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:13+5:302021-09-10T04:31:13+5:30
कोल्हापूर : साखर व्यवसायात गुंतवणूक करा. चांगला परतावा देऊ असे आमिष दाखवून सातजणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोल्हापुरात ...

साखर व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोटींचा गंडा
कोल्हापूर : साखर व्यवसायात गुंतवणूक करा. चांगला परतावा देऊ असे आमिष दाखवून सातजणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोल्हापुरात घडली. याप्रकरणी संशयिताला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपशहरप्रमुख विशाल देवकुळे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील संशयिताने स्टार बिझनेस एडवाइजर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. या माध्यमातून साखरेचा व्यवसाय करत असल्याचे अनेकांना सांगितले. या व्यवसायात गुंतवणूक करा, चांगल्या रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्याने विनायक पाटील, विशाल वायदंडे, अमित कदम, रवींद्र हातकर, कोमल वैराट, पवित्रा हातकर, बाळाबाई वायदंडे यांची एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी सशयितावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन देवकुळे यांनी पो. नि. राजेश गवळी यांची भेट घेऊन दिले.