कृषी विधेयकांच्या समर्थनात ‘रयत क्रांती’चे दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:02+5:302020-12-15T04:39:02+5:30
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरून देशभर आरोप-प्रत्यारोपांचे रान उठले आहे. रयत क्रांती संघटनेने विधेयकांच्या समर्थनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ‘रयत’चे संपर्कप्रमुख ...

कृषी विधेयकांच्या समर्थनात ‘रयत क्रांती’चे दुग्धाभिषेक
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरून देशभर आरोप-प्रत्यारोपांचे रान उठले आहे. रयत क्रांती संघटनेने विधेयकांच्या समर्थनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ‘रयत’चे संपर्कप्रमुख प्रा. एन. डी. चौगले म्हणाले, देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे असून त्याची अंमलबजावणी तातडीने करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्या आधीच त्याचा दर ठरविला जाणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील दलांलाची साखळी तुटणार आहे. शेतकरी हिताचा विचार करून केंद्र सरकारने तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी करावी.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवदेन दिले. यावेळी, रुपाली पाटील, सूरज पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनात रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बळिराजाला प्रतीकात्मक दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी प्रा. एन. डी. चौगले, रुपाली पाटील, सूरज पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१४१२२०२०-कोल- रयत) (छाया- नसीर अत्तार)
-राजाराम लोंढे