शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

Kolhapur: मोक्कातील आरोपीची जंगी मिरवणूक, दुधाने घातली आंघोळ, व्हिडिओ व्हायरल; सातजणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:00 IST

चौघांना अटक : नागाळा पार्कातील टोळीचा प्रताप

कोल्हापूर : मोक्कांतर्गत कारवाई झालेला गुन्हेगार अनिकेत अमर सूर्यवंशी (वय २१, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) हा कळंबा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणुकीने त्याचे स्वागत करणाऱ्या आणि त्याचे रिल्स सोशल मीडियातून व्हायरल करणाऱ्या सातजणांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एक कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या. मिरवणुकीचा प्रकार २४ डिसेंबरला घडला, तर सोमवारी (दि. ६) सकाळी त्यांनी आर. एस. कंपनी १२५ या इन्स्टा अकाऊंटवरून रिल्स व्हायरल केले.याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत अमर सूर्यवंशी (वय २१), गब्बर ऊर्फ आदित्य अमर सूर्यवंशी (२५, दोघे रा. केव्हीज पार्क, नागाळा पार्क), अनुराग दिलीप राखपसारे (२०, रा. शाहूपुरी), करण ऊर्फ तुषार सिद्धू कुमठे (२२, रा. विचारे माळ, सदर बाजार), सागर कैलास गौडदाब (३४, रा. गणेश पार्क, कदमवाडी), प्रथमेश कुमार समुद्रे (२०, रा. सदर बाजार) आणि वेदांग शिवराज पोवार (२०, रा. बिंदू चौक, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यातील गब्बर सूर्यवंशी, प्रथमेश समुद्रे आणि वेदांग पोवार वगळता इतरांना अटक झाली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात नागाळा पार्कातील सूर्यवंशी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. २०२१ पासून टोळी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. यातील गब्बर ऊर्फ आदित्य सूर्यवंशी याची वर्षभरापूर्वी सुटका झाली. अनिकेत सूर्यवंशी याची २४ डिसेंबरला सुटका झाली. त्याचे नातेवाईक आणि समर्थकांनी कळंबा कारागृहापासून ते केव्हिज पार्कपर्यंत मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले. घरातही रांगोळ्या घालून स्वागत झाले. समर्थकांनी याचे व्हिडीओ आर. एस. कंपनी १२५ या इन्स्टा अकाऊंटवरून व्हायरल करताच हा प्रकार पोलिसांच्या नजरेत आला. गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत असल्याने पोलिसांनी तातडीने सातजणांवर गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.

फुलांच्या रांगोळ्या अन् दुधाचा अभिषेकअनिकेत सूर्यवंशी याचे नातेवाइकांनी जोरदार स्वागत केले. दारात मंडप घालून फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. घरी येताच त्याला खुर्चीत बसवून दुधाचा अभिषेक घातला. औक्षण करून त्याला घरात घेतले. याचे व्हिडीओ व्हायरल करून टोळी पुन्हा दबदबा वाढविण्याचा प्रयत्न करीत होती.

पोलिसांचा इशारारिल्समधून विरोधी टोळ्यांना चिथावणी देणे, आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करणे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस