मायलेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:27 AM2021-09-23T04:27:21+5:302021-09-23T04:27:21+5:30

मुळातच हुशार... कुशल रमाने खेळात प्रावीण्य सहज मिळवलं... तिला बक्षिसांमागून बक्षीस मिळत गेलं... न... एक दिवस तो दिवस उगवला... ...

Milek | मायलेक

मायलेक

googlenewsNext

मुळातच हुशार... कुशल रमाने खेळात प्रावीण्य सहज मिळवलं... तिला बक्षिसांमागून बक्षीस मिळत गेलं... न... एक दिवस तो दिवस उगवला... काळदिवसच ठरला त्यांच्या घरावर. तुळशीच्या दारूड्या नवऱ्याने तिच्या सवतीला घेऊन बाहेर फिरायला जायते ठरवले. नि ती दोगं... सकाळीच बाहेर पडली.. त्यांच्यासाठी तुळशीने नाश्ता-डब्याची तयारी करून दिली... आता तुळशीला जास्तीची कामं झेपत नव्हती. शरीरपण थकत चाललेलं- वार्धक्याकडे झुकलेली ती आता दमलेली दिसत होती. आमच्याकडचे कामही तिच्यासाठी कमी केलं. ... नि... वरची हलकी कामं दिली... त्यामुळे तुळशीला कामावरून काढून न टाकता पैशाची मदतही झाली... सवत त्या दिवशी सकाळी नटूनच दादल्याबरोबर बाहेर पडली... नंतर रमाची तयारी करता करता दिवस गेला... न् ती वाईट बातमी संध्याकाळी त्यांच्या कानांवर पडली- दारूच्या नशेत जाता... दादला... न सवत अपघातात दगावले... आता रमा पूर्णपणे पोरकी होऊन बसलेली, पण लगेचच तिने कंबर कसली. रमाची सगळी जबाबदारी सर्वार्थाने तिच्यावर पडली. दिवस जात होते - रमा तारुण्यात फुलत चाललेली.. तुळशी - चांगल्या भविष्यासाठी शिक्षणासाठी ती झटत राहिली... झेपत नाही तरी जास्तीची कामं तिने धरली... असेच दिवस जात होते - महिने एक-दोन वर्षे सरली... आणि अचानकच एका पहाटे तुळशी अंथरुणातून उठूच शकत नव्हती. तिच्यात काही त्राणच राहिले नव्हते. उठायचा प्रयत्न करायची नि परत अंथरुणातच पडायची. रमाने भराभर डॉक्टरांची मदत घेऊन तिला दवाखान्यात ठेवले. सगळ्या टेस्ट-चाचण्या झाल्यावर.. रक्तदाब - हिमोग्लोबीन कमी रिपोर्ट आला.. तिला रक्त द्यावे लागणार होते... एवढा सगळा खर्च बघून रमा पुढे सरसावली. तिचा न तुळशीचा रक्तगट एक असल्याने तिने रक्तदान केले. थोड्या दिवसांची तुळशी ताजातवानी होऊन दारात हजर. रमेना मला वाचवलं. किती गुणाची.. न काय.. आमचे किती जन्माचे ऋणानुबंध असतील न जाणो - किती न किती सांगू..

Web Title: Milek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.