कोल्हापूर: खुदाई करताना बसला वीजेचा धक्का, परप्रांतिय मजूराचा झाला मृत्यू; आदमापूरातील घटना
By सचिन भोसले | Updated: September 30, 2022 17:57 IST2022-09-30T17:55:45+5:302022-09-30T17:57:15+5:30
डबक्यात साचलेले पाणी काढण्यासाठी बसवली होती पाण्याची मोटार.

कोल्हापूर: खुदाई करताना बसला वीजेचा धक्का, परप्रांतिय मजूराचा झाला मृत्यू; आदमापूरातील घटना
कोल्हापूर : खुदाई काम करताना शुक्रवारी सकाळी वीजेचा धक्का बसून परप्रांतिय मजूराचा मृत्यू झाला. सौरभ रविकांत विश्वकर्मा (वय २०, रा. कैती, उत्तरप्रदेश, सध्या रा. आदमापूर) असे त्याचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, सौरभ विश्वकर्मा हे आज सकाळी पाचच्या सुमारास आदमापूर येथील ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ खुदाईचे काम करत होते. खुदाईवेळी डबक्यात साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याची मोटार बसवली आहे. सौरभ हे त्या मोटारीजवळ गेले होते. त्यावेळी त्यांना वीजेचा धक्का बसला.
वीजेचा धक्का बसल्याने सौरभ बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.