ट्रायलच्या नावाखाली मर्सिडेझ बेंझ कार पळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 21:33 IST2017-08-01T21:33:42+5:302017-08-01T21:33:42+5:30
कार खरेदी करण्याचे आमिष दाखवून ट्रायलच्या नावाखाली मित्राची ५० लाख किमतीची आलिशान कार पळवून नेली. याप्रकरणी संशयित आरोपी दीपक अमृतलाल सोळंकी याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला.

ट्रायलच्या नावाखाली मर्सिडेझ बेंझ कार पळवली
कोल्हापूर, दि. 1 कार खरेदी करण्याचे आमिष दाखवून ट्रायलच्या नावाखाली मित्राची ५० लाख किमतीची आलिशान कार पळवून नेली. याप्रकरणी संशयित आरोपी दीपक अमृतलाल सोळंकी (रा. सनसिटी, न्यू पॅलेस परिसर) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी, राजेंद्र अरविंद अलूरकर (वय ५२, रा. ई वॉर्ड, शाहूपुरी) यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वत:साठी ५० लाख किमतीची मोटारकार खरेदी केली होती. संशयित दीपक सोळंकी याने मित्र नितीन चौगुले (रा. पितळी गणपती चौक) याच्यामार्फत अलूरकर यांच्याशी ओळख करून घेतली. त्यातून त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर दि. १६ सप्टेंबर २०१६ सोळंकी याने माझी एका व्यवहारात रक्कम येणार आहे, असे सांगून अलूरकर यांच्याशी त्यांच्या ट्रान्स्पोर्ट कार्यालयात कार खरेदीचा व्यवहार केला. त्यानंतर कारची ट्रायल बघून येतो म्हणून घेऊन गेला तो परत आलाच नाही. कारच्या व्यवहाराचे पैसे न दिल्याने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद अलूरकर यांनी सोळंकीच्या विरोधात दिली.