शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर खंडपीठ: १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट, पालकमंत्री आबिटकर यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:38 IST

चुयेकर यांचे उपोषण मागे

कोल्हापूर : खंडपीठाच्या चर्चेसाठी खंडपीठ कृती समितीला १५ दिवसात भेटीची वेळ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी (दि. २४) उपोषणस्थळी भेट देऊन सांगितले. त्यामुळे माणिक पाटील-चुयेकर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळपाणी घेऊन उपोषण संपवले. खंडपीठासाठी पुन्हा उपोषण करायला लागू नये, अशी अपेक्षा चुयेकर यांनी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी आंदोलन निर्णायक टप्प्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पदवीधर मित्रचे माणिक पाटील-चुयेकर यांनी १६ फेब्रुवारीपासून दसरा चौकात आमरण उपोषण सुरू केले होते. खंडपीठाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीला वेळ द्यावा, असा आग्रह चुयेकर यांनी धरला होता. उपोषण मागे घेण्याबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार विनंती केली होती. तरीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर चुयेकर ठाम होते.अखेर पालकमंत्री आबिटकर यांनी सोमवारी चुयेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. येत्या १५ दिवसात कृती समितीला भेट देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यानुसार भेट होऊन खंडपीठासाठी सरकार ठोस पावले उचलेल, असे त्यांनी सांगितले. बैठकीसह खंडपीठाच्या पाठपुराव्यासाठी सामूहिक प्रयत्न करून हा लढा गतिमान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.चुयेकर यांचे मनोगत प्रा. मधुकर पाटील यांनी वाचून दाखवले. लोकप्रतिनिधींसह सर्व संघटना, संस्थांनी मनोधैर्य वाढवल्यामुळे उपोषणाचे शिवधनुष्य पेलू शकलो, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अशोकराव माने, वसंतराव मुळीक, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत, ॲड. शिवाजीराव राणे, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन मिळताच उपस्थितांनी गूळ वाटून आनंद साजरा केला.कोण काय म्हणाले?कोल्हापुरातील खंडपीठासाठी राज्य सरकारने आता आग्रही बनावे. सरकारला चुयेकरांच्या उपोषणाची दखल घ्यावी लागली. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर कृती समितीची बैठक घडवून आणावी. - सर्जेराव खोत, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशनखंडपीठाच्या मागणीला मूर्त स्वरूप यावे, यासाठी चुयेकरांचे प्रयत्न उपयुक्त ठरतील. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सगळ्यांनी खंडपीठासाठी प्रयत्न केले आहेत. यापुढेही ते सुरूच राहतील. निर्णायक लढा अंतिम टप्प्यात आला आहे. - धनंजय महाडिक, खासदारनिवडणुकांमुळे खंडपीठाचा मुद्दा थोडा पुढे गेला. याला पुन्हा गती देण्याचे काम चुयेकर यांच्या उपोषणाने झाले. खंडपीठ कृती समिती आणि मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. लवकरच या भेटीने खंडपीठाच्या मागणीला बळ मिळेल. - संजय मंडलिक, माजी खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयChief Ministerमुख्यमंत्री