शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘सुळकूड’पाणी योजनेबाबत १६ जानेवारीला बैठक, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:49 IST

टेक्स्पोजरला मंत्री पाटील यांची भेट

इचलकरंजी : सुळकूड पाणी योजनेसंदर्भात १६ जानेवारीला मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना कृती समिती पाटील यांना काळे झेंडे दाखविणार होते. मात्र, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि पोलिसांनी शिष्टाई केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.मंत्री पाटील यांनी टेक्स्पोजर २०२४ ला भेट देण्यासाठी पंचरत्न मंगल कार्यालयात आले असता त्यावेळी त्यांनी कृती समितीशी चर्चा केली. शहराला सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे. त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, दुधगंगा नदीकाठच्या नागरिकांनी याला विरोध केला आहे. तसेच त्या भागातील नेत्यांचाही विरोध आहे. अनेकवेळा राज्य सरकारने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले नाही. त्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील हे इचलकरंजीत येणार असल्याचे कळाल्यानंतर कृती समितीने काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिस प्रशासन, माजी आमदार हाळवणकर यांच्या मदतीने पाटील यांच्यासोबत कृती समितीस चर्चेला बोलावून निवेदन स्वीकारले आणि कागल परिसरातील मंत्री यांच्यासोबत येत्या आठ दिवसांत फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्ते शांत झाले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, अभिजित पटवा, विजय जगताप, रसूल नवाब, सुनील बारवाडे, कौशिक मराठे, नागेश शेजाळे, उमेश पाटील, विद्यासागर चराटे, आदी उपस्थित होते.मंत्री पाटील येणार असल्याने पंचरत्न कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांची मंत्र्यासोबत भेट झाल्यानंतरही एका आंदोलनकर्त्याला काही वेळ तिथेच थांबवून ठेवण्यात आले होते.

टेक्स्पोजरला मंत्री पाटील यांची भेटपंचरत्न कार्यालयामध्ये यंत्रमाग उद्योगासंदर्भात भरलेल्या मशिनरी प्रदर्शनाला वस्त्रोद्योगमंत्री पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली. अत्याधुनिक यंत्रमागाची पाहणीही त्यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीichalkaranji-acइचलकरंजीchandrakant patilचंद्रकांत पाटील