शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
4
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
5
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
6
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
7
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
8
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
9
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
10
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
11
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
12
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
13
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
14
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
15
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
16
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
17
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
18
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
19
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
20
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गप्रश्नी आठवड्यात बैठक; नितीन गडकरी यांचे संसदेत आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:11 IST

वर्षात काम पूर्ण करण्याचे मंत्र्यांनी दिले आश्वासन

कोल्हापूर : सातारा ते कोल्हापूरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडचणी आल्याने विलंब होत आहे. पुढच्या आठवड्यात यासंबंधी बैठक घेऊन कामाला गती दिली जाईल. पुढील एक वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी संसदेच्या अधिवेशनात पुणे ते कोल्हापूरपर्यंतच्या महामार्गाच्या कामात दिरंगाई होत असल्याकडे लक्ष वेधले. याला उत्तर देताना मंत्री गडकरी यांनी हे आश्वासन दिले.खासदार सुळे प्रश्न विचारताना म्हणाल्या, पुणे ते कोल्हापूर महामार्गाच्या कामास ठेकेदारांच्या अडचणीमुळे विलंब होत आहे. काही ठेकेदारांना ब्लॅक लिस्टही केले आहे. दरम्यान, या महामार्गावर अपघाताच्या घटना वाढत आहेत. अपघात कमी करण्यासाठी केेंद्राकडून पथक आले होते. त्यांनी सुचविलेल्या काही उपाययोजना केल्याने अपघाताच्या घटना कमी झाल्या आहेत; पण अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सरकार काय करणार आहे?याला उत्तर देताना मंत्री गडकरी म्हणाले, पुणे ते कोल्हापूर महत्त्वाचा महामार्ग आहे. यातील पुणे ते सातारा महामार्गाचे काम पहिल्यांदा रिलायन्स कंपनीकडे होते. आता दुसऱ्या कंपनीकडे काम दिले आहे. यावर पुन्हा नवीन अभ्यास सुरू आहे. पुणे ते साताऱ्यापर्यंत चांगला महामार्ग करण्यासाठी सहा हजार कोटींचा नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. यावर विभागातर्फे लवकरच काम सुरू केले जाईल. खंबाटकी घाटातील नवीन टनेल खुले केले जाईल.सातारा ते कोल्हापूरपर्यंतच्या महामार्गाचे काम ठेकेदार कंपनीस दिले आहे; पण काही अडचणी आल्या आहेत. पुढच्या आठवड्यात यावर आढावा बैठक घेणार आहे. कामासंबंधी काही सूचना कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती आणि इतरांनी दिल्या आहेत. त्यांचीही दखल घेतली आहे. पुढच्या एक वर्षात हे कामही पूर्ण केले जाईल, असा प्रयत्न आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur-Satara Highway Issue: Meeting in a Week, Gadkari Assures Parliament

Web Summary : Nitin Gadkari promised Parliament a meeting next week to expedite the delayed Kolhapur-Satara highway project. He assured completion within a year, addressing concerns raised about accidents and contractor issues. A new six-thousand-crore project is planned for Pune-Satara stretch.