कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्याबाबतीत शिंदेसेनेच्या नेत्यांची गुरुवारी दुपारी येथील सिंचन भवनच्या शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. यावेळी प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत याबाबतचा फॉर्म्युला ठरेल असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी लागल्यानंतर कोणत्याच पक्षाचे नेते एकत्रित बसलेले नाहीत. त्यात शिंदेसेनेच्या नेत्यांनी पहिला मुहूर्त साधन गुरुवारी प्राथमिक चर्चा केली. या बैठकीला आबिटकर यांच्यासोबतच खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आमदार चंद्रदीप नरके उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.शिंदेसेनेचे ९ तर यड्रावकर यांच्या शाहू आघाडीचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी संख्या आणि आपल्या सदस्यांची संख्या यावरून प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. तसेच भुदरगड, करवीर राधानगरी, कागल, आजरा, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात काही ठिकाणी पक्षाला फटका असल्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
अजूनही महायुती म्हणून एकत्र बसण्यासाठी कोणाचाही निरोप नाही. जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर आम्ही सर्वजण भेटलो नव्हतो. म्हणून ही बैठक झाली. यावेळी प्राथमिक चर्चा झाली. महायुतीची बैठक लवकरच होईल. त्यामध्ये पुढील चर्चा करून निर्णय घेऊ. -प्रकाश आबिटकर पालकमंत्री, कोल्हापूर
Web Summary : Shinde Sena leaders met to discuss Zilla Parishad elections. Preliminary discussions occurred; a formula will be decided soon with Mahayuti leaders. Focus on member numbers and losses in specific talukas.
Web Summary : शिंदे सेना के नेताओं ने जिला परिषद चुनावों पर चर्चा की। प्रारंभिक चर्चा हुई; महायुति नेताओं के साथ जल्द ही एक फार्मूला तय किया जाएगा। सदस्य संख्या और कुछ तालुका में नुकसान पर ध्यान केंद्रित किया गया।