वस्त्रोद्योगातील अडचणीची सरकारने दखल घेऊन यंत्रमागधारकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी असोसिएशनने वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर व वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांना भेटून व निवेदनाद्वारे बैठक आयोजित करण्याची तसेच व्यापारातील या विसंगती दूर करण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे या बैठकीचे आयोजन केलेले आहे. या बैठकीमध्ये वीज दर प्रश्न, मल्टिपार्टी वीज कनेक्शन प्रश्न, बँक कर्जावरील व्याज दर प्रश्न हे सगळे मुद्दे मांडण्यात येतील आणि याव्यतिरिक्त जर काही मागणी अथवा सूचना असल्या तर ती यंत्रमागधारकांनी सोमवार (दि १) सायंकाळी ५.०० पर्यंत पॉवरलूम असोसिएशनमध्ये लेखी स्वरूपात आणून द्याव्यात, असे आवाहन अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}