‘गोकुळ’ची आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:58+5:302021-02-05T07:13:58+5:30
काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सभा आज, बुधवारी दुपारी एक वाजता संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील ...

‘गोकुळ’ची आज सभा
काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सभा आज, बुधवारी दुपारी एक वाजता संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सभागृहात होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सभा होत असल्याने विरोधी व सत्तारूढ गटाने जोरदार तयारी केली आहे.
संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने ते सभेला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ठिकाणी ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे. संघाने गेल्या वर्षभरात नैसर्गिक संकटे येऊनही दूध उत्पादकांना चांगला दर दिल्याचा दावा सत्तारूढ गटाचा आहे, तर आर्थिक वर्षात भरमसाट खर्च केल्याने उत्पादकांचे नुकसान झाल्याचा आराेप विरोधकांनी केला आहे. त्यात ‘गोकुळ’च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेवर होणार, हे निश्चित आहे. सभा चालवण्याची सूचना सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी करून सावध भूमिका घेतली आहे.