कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमवेत बैठक
By Admin | Updated: January 25, 2015 01:08 IST2015-01-25T00:57:13+5:302015-01-25T01:08:53+5:30
विपीन शर्मा घेणार एफ.आर.पी.बाबत आढावा

कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमवेत बैठक
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. २७) पुणे येथे होणार आहे. किती कारखान्यांनी एफ. आर. पी.प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले याचा आढावा साखर आयुक्त विपीन शर्मा घेणार आहेत.
हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी सुरुवातीला तुटलेल्या उसाचे पैसे अद्याप काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. याप्रकरणी कारखानदारांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. झालेले गाळप व शेतकऱ्यांना दिलेले पैसे याची माहिती मंगळवारच्या बैठकीत घेऊन येण्यास सांगितले आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर साखर कारखान्यांवर ‘आरसीसी’प्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त शर्मा यांनी दिला आहे.