महाराष्ट्र बँकेमध्ये व्यवसायवृद्धीसाठी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:22+5:302021-09-21T04:27:22+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने व्यवसाय वृद्धीसाठी शनिवारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये किरकोळ आणि वाणिज्य कर्जाचे प्रमाण ...

महाराष्ट्र बँकेमध्ये व्यवसायवृद्धीसाठी मेळावा
कोल्हापूर : महाराष्ट्र बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने व्यवसाय वृद्धीसाठी शनिवारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये किरकोळ आणि वाणिज्य कर्जाचे प्रमाण वाढविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
लक्ष्मीपुरी शाखेतील कार्यक्रमासाठी गोखले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. पी. पाटील उपस्थित होते. विभागीय प्रबंधक संदीपकुमार चौरासिया यांनी बँकेच्या ८७ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांचे आभार मानले. शाखा प्रबंधक नानासाहेब थोरात यांनी सूत्रसंचालन केले.
मिड कॉर्पोरेट शाखेत एमएसएमई प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विभागीय प्रबंधक संदीपकुमार चौरासिया, मोनाली हिवरकर, शाखाधिकारी अमित कुमार आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन चौरासिया यांनी केले. त्यांच्या हस्ते या वेळी ग्राहकांना कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आली. साक्षी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले तर तुषार जयस्वाल यांनी आभार मानले.
२००९२०२१ कोल बँक ऑफ महाराष्ट्र न्यू
महाराष्ट्र बँकेचे विभागीय प्रबंधक संदीपकुमार चाैरासिया यांच्या हस्ते ग्राहकांना कर्ज मंजुरी पत्रे वितरित करण्यात आली.