शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘प्राधिकरणा’ची बैठक बुधवारी, शनिवारची बैठक रद्द : बैठकीतून ग्रामस्थांची संभ्रमावस्था दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:24 IST

कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची शनिवारी होणारी बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अचानक मुंबईला गेल्यामुळे रद्द करण्यात आली. हीच बैठक बुधवारी (दि.१ आॅगष्ट) रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापरिषदेच्या सभागृहात होणार आहे.

ठळक मुद्दे‘प्राधिकरणा’ची बैठक बुधवारी, शनिवारची बैठक रद्द बैठकीतून ग्रामस्थांची संभ्रमावस्था दूर करणार

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची शनिवारी होणारी बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अचानक मुंबईला गेल्यामुळे रद्द करण्यात आली. हीच बैठक बुधवारी (दि.१ आॅगष्ट) रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापरिषदेच्या सभागृहात होणार आहे.कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणामध्ये समाविष्ट असलेल्या ४२ गावाचा प्राधिकरणाला विरोध वाढत आहे. ‘प्राधिकरण’बाबत या समाविष्ट गावांना माहिती नसल्याने या गावामध्ये प्रधिकरणाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सर्वच गावांनी प्राधिकरण नकोच अशीच भूमीका घेतली आहे. समाविष्ट गावातील पदाधिकारी व नेत्यांच्या वारंवार बैठका होऊन कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.दरम्यान, ‘प्राधिकरण’ म्हणजे काय? या प्राधिकरणाचे काम काय? प्राधिकरणामुळे समाविष्ट गावांना निधी कसा मिळणार, त्यां गावांचा विकास कसा साधणार? याबाबत असणारी संभ्रमास्था, गैरसमज दूर करण्यासाठी अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधिकरण समितीची बैठक शनिवारी निश्चित केली होती. पण मंत्री पाटील यांना एका बैठकीसाठी अचानक मुंबईला जावे लागल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे हीच बैठक बुधवारी (१ आॅगष्ट) रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात होत आहे.

या बैठकीस मंत्री पाटील यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, समाविष्ट ४२ गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, करवीर व हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार आहेत. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर