मध्यम, लघु प्रकल्प तहानलेले
By Admin | Updated: July 6, 2015 00:14 IST2015-07-06T00:14:44+5:302015-07-06T00:14:44+5:30
जिल्ह्यात पावसाने जरी सरासरी पार केली असली तरी पावसाच्या ३५ दिवसांत केवळ १० दिवस पाऊस पडला आहे.

मध्यम, लघु प्रकल्प तहानलेले
कोल्हापूर : अत्यंत मेहनती, कष्टाळू आणि शिक्षणाने कमी परंतु काळानुरूप वैचारिक पातळीवर स्वत:मध्ये बदल करणाऱ्या येथील चितोडिया रजपूत लोहार घिसाडी समाजाने कोल्हापुरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोर्ट-कचेऱ्यांपेक्षा सामाजिक न्याय निवाड्याला असलेले महत्त्व हे या समाजाचे वैशिष्ट्य आहे. समाजात आता आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी आली असली तरी यापुढील काळात नव्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने शैक्षणिक सधनता आणण्याचे प्रागतिक विचार समाजात पक्के रुजले आहेत, हेही विशेष होय.
मूळचा राजस्थानमधील चितोड संस्थानातील चितोडिया रजपूत लोहार घिसाडींचा हा वंश कोल्हापुरात केव्हा दाखल झाला याचे नेमके पुरावे आढळत नसले तरी, येथील मातीशी मात्र आज या समाजाची नाळ घट्टपणे जोडली गेली आहे. स्वकर्तृत्वाने समाजाने आपले एक आपुलकीचे स्थान पटकाविले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हा भटका समाज व्यवसायाच्या निमित्ताने देशभर विखुरला गेला. अनेकजण महाराष्ट्रातही आले. १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि महाराष्ट्रात असलेल्या या समाजाचे संघटन ढेबरभाई यांनी केले. त्यांनी १९५५ साली ‘चलो चितोडगड’ हा नारा देशभर विखुरलेल्या समाजाला दिला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेतला गेला. या मेळाव्याला कोल्हापुरातून माजी कौन्सिलर दगडोबा पोवार व श्रीपती तुकाराम पोवार समाजबांधवांना घेऊन गेले होते. मेळाव्याहून परत आल्यावर त्यांनी समाजाचे संघटन केले. तेव्हापासून समाजाच्या चालीरीती, रोटीबेटीचे व्यवहार सुरू झाले ते आजअखेरपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. घिसाडी समाजात स्वतंत्र अशी पंच कमिटी असते. या पंच कमिटीचा निकाल हा सर्वांवर बंधनकारक असतो. विशेष म्हणजे न्यायालये असताना आजही पंच कमिटीचे निर्णय मानले जातात. दैनंदिन रीतिरिवाजांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध घटनांत पंच कमिटीच निर्णय घेत असते. एखाद्याचे लग्न ठरविणे असो की बाळंतपण असो; सुंठवडा असो की मृत्युपश्चात निर्णय असोत; सर्व काही नियम पंच कमिटीने ठरविलेले आहेत. ते सर्वांना पाळावे लागतात. समाजाने अलीकडे काही सुधारणावादी निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये वेळ, पैसा आणि वाया जाणारी शक्ती यांचा विचार केलेला आहे. पूर्वी समाजात लग्नविधी सात ते दहा दिवस चाललेले असत. आता ते एका दिवसावर आणले आहेत. (प्रतिनिधी)
समाजातील मान्यवर मंडळी
१९४५ मध्ये नगरपालिकेवर दगडोबा पोवार यांनी कौन्सिलर म्हणून काम केले. राजकारण व समाजकारणातील हीच परंपरा नंतरच्या काळात आर. के. पोवार, दिलीप पोवार, रमेश पोवार, मुक्ताबाई पोवार, सरस्वती पोवार, मंगला शिवाजीराव चव्हाण यांनी सांभाळली. ‘आर.के.’ या शहराचे महापौर झाले, तर रमेश पोवार स्थायी समितीचे सभापती झाले. बाबूराव खंडेराव पोवार गव्हर्न्मेंट सर्व्हंट बॅँकेचे अध्यक्ष झाले. संभाजी पोवार संचालक आर. आर. सूर्यवंशी सुप्रसिद्ध शिल्पकार बनले. हिंदुराव पोवार टू व थ्री व्हीलर संघटनेचे अध्यक्ष बनले. मदन सूर्यवंशी यांनी बांधकाम व्यावसायिक, तर मारुतराव सूर्यवंशी यांनी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला. समाजाचे अध्यक्ष युवराज पोवारही संघटनकार्य करीत आहेत.
आदर्शवत बदल
लग्नात हुंडा किंवा लग्नाचा खर्च मागणं हे शिकलेल्या समाजात आजही सुरूच आहे; परंतु घिसाडी समाजाने मात्र ही पद्धत कधीच स्वीकारली नाही. पूर्वीच्या काळी मुलाकडील मंडळींनी वधू माता-पित्यांना बंदे १०१ रुपये देण्याची पद्धत होती; पण तीही आता बंद पडली आहे. वर आणि वधूकडील मंडळी लग्नातील सर्व खर्च समान करतात; त्यामुळे एकट्यावर आर्थिक भार पडत नाही.
१२० घरे, अडीच हजार लोकसंख्या
कोल्हापुरात घिसाडी समाजाची १२० घरं आहेत; तर त्यांची लोकसंख्या अडीच हजार इतकी आहे. सर्वच कुटुंबे पारंपरिक व्यवसायात आहेत. युद्धशस्त्र निर्माण करणे हे या समाजाचे वैशिष्ट्य आहे. तलवारी व भाले तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे; परंतु आता शस्त्र तयार करण्यावर बंदी असल्याने समाजातील अनेकांनी लोहारकाम, फॅब्रिकेशन, पाईप बनविण्याच्या कामात झोकून दिले आहे. काहींनी स्पेअर पार्ट विक्रीतही प्रवेश केला आहे. सिमेंट पाईप तयार करण्याच्या व्यवसायात काहींनी नाव कमावले आहे.
सुंठवडा झाल्यावरच समाजमान्यता
एखादे मूल जन्माला आल्यावर त्याच्या दृष्टीने सुंठवडा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असतो. मूल जन्मल्यावर तिसऱ्या दिवशी मुलीकडील मंडळी मुलाकडील पुरुषांना बोलवतात. त्यांना गूळ व ओवा शिजवून तो सुक्या खोबऱ्याच्या वाटीत घालून खायला द्यायची प्रथा आहे; तर पाचव्या दिवशी निवडक महिलांना बाळंतविडा दिला जातो. ही प्रथा न पाळणाऱ्यास समाजाशी कोणतेही व्यवहार करता येत नाहीत.
सधन, तरीही शिक्षणाचे दारिद्र्य
हा समाज प्रचंड मेहनती व कष्टाळू आहे. त्यातून आर्थिक सुबत्ता आली. परंतु शिक्षणाचे दारिद्र्य आजही पाहायला मिळते. पारंपरिक व्यवसाय सांभाळताना समाजातील मुलांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. १९६८ मध्ये हिंदुराव पोवार नावाचे गृहस्थ चार जिल्ह्यांत मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यांचा श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांच्या हस्ते सत्कार केला होता. त्यानंतर शिक्षणात मोठी कामगिरी कोणी केली नाही. अलीकडच्या काळात मुलांच्या शिक्षणाकडे पालक लक्ष देऊ लागला आहे.