वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उद्यापासून ‘काम बंद’चा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:41+5:302021-04-28T04:25:41+5:30
कोल्हापूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत ...

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उद्यापासून ‘काम बंद’चा इशारा
कोल्हापूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, या मागणीसाठी येथील ‘सीपीआर’मधील ४४ वैद्यकीय अधिकारी उद्या, गुरुवारपासून काम बंद आंदोलन करणार आहेत. राज्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एक दिवस काम बंद आंदाेलन करण्यात आले होते.
राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक वर्षे शासकीय सेवेत कायम करण्यात आलेले नाही. या मागणीसाठी गेल्या आठवड्यात या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला होता. त्यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती; परंतु त्यावर कार्यवाही न झाल्याने आता उद्या, गुरुवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.