शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

मी समाजासोबत, राजकीय द्वेषातून आंदोलन, खासदार धैर्यशील माने यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 12:42 IST

कोल्हापूर : मी सुरुवातीपासूनच मराठा समाजासोबत असून यापुढेही सदैव राहणार आहे. मराठा आरक्षणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. मात्र निव्वळ ...

कोल्हापूर : मी सुरुवातीपासूनच मराठा समाजासोबत असून यापुढेही सदैव राहणार आहे. मराठा आरक्षणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. मात्र निव्वळ राजकीय द्वेषापोटी चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे स्पष्टीकरण खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.पेठवडगाव येथे गुरुवारी सकाळी खासदार धैर्यशील माने हरवले आहेत, असा फलक करून त्याची मिरवणूक काढण्यात आली. तर पोलिस ठाण्यात तक्रारही देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर माने पत्रकात म्हणतात, मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार म्हणून लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून आरक्षणाची प्रभावी मागणी केली. कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चावेळी मी रुग्णालयात असतानाही सलाईनसह सहकुटुंब मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. विनंतीला मान देऊन मी मतदारसंघातील सर्व कार्यक्रम रद्द केले. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून विशेष अधिवेशनाची मागणी केली. याबाबतच्या बातम्याही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असताना कोणतीही माहिती न घेता निव्वळ राजकीय द्वेषापोटी चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून जाणूनबुजून लोक मला बदनाम करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण