शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुती सुरक्षेचे आले भान

By admin | Updated: July 10, 2014 00:54 IST

माता मृत्यू प्रमाण घटतेय : वर्षभरात ४१ हजार प्रसुतीमध्ये १५ मातांचा मृत्यू

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरआरोग्य विभागाने शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण घटत चालले आहे. रक्तक्षयामुळे माता मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने गेली दोन वर्षे जिल्हा आरोग्य विभागाने त्याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचे फलित दिसू लागले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण अल्प असून प्रबोधनातून गरोदर मातांमध्ये जागृतीची मोहीम आरोग्य विभागाने हातात घेतली आहे. एवढ्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध असताना राज्यात माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. ही बाब निश्चितच चिंताजनक असल्याने शासनाने गरोदर मातांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत पण त्याचा प्रसार व प्रचार व्यवस्थित होत नसल्याने अनेक जिल्ह्यांत हे उपक्रम केवळ कागदावरच दिसतात. पण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या दोन वर्षांत माता मृत्यू नियंत्रित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. एकूण माता मृत्यूपैकी २५ टक्के मातांचे मृत्यू हे रक्तक्षयानेच होतात. गरोदर मातेच्या अंगात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने प्रसुतीवेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन माता दगावण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण फारच कमी आढळते. यासाठी आरोग्य विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे परिणाम सध्या दिसत असून गेल्या वर्षभरात शासकीय दवाखान्यात ४१ हजार १३५ प्रसुती झाल्या, यामध्ये १५ मातांचे मृत्यू झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी ३९ हजार प्रसुतीमध्ये ३७ मातांचे मृत्यू झाले होते. दोन वर्षांत माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. काय आहे ‘जननी सुरक्षा’राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाच्यावतीने जननी सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो. त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण महिलेची शासकीय दवाखान्यांत प्रसुती झाल्यानंतर त्या मातेला ७०० रुपये तर शहरी मातेला ६०० रुपये अनुदान दिले जाते. घरी प्रसुती झाली तर पाचशे रुपये दिले जातात. त्याचबरोबर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमातंर्गत गरोदर मातेला घरापासून दवाखान्यापर्यंत आणले जाते. प्रसुतीनंतर तीन दिवस पोषक आहार मातेला दिला जातो. १०० टक्के मोफत तपासण्या व औषधोपचार केला जातो.