दिगंबर, अमृता यांचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:45+5:302021-06-27T04:17:45+5:30
कोल्हापूर : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील सरस्वती महिला शिक्षण संस्थेत दिगंबर सुधाकर रोकडे आणि अमृता विठ्ठल माळी या दोघांचा ...

दिगंबर, अमृता यांचा विवाह
कोल्हापूर : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील सरस्वती महिला शिक्षण संस्थेत दिगंबर सुधाकर रोकडे आणि अमृता विठ्ठल माळी या दोघांचा शनिवारी विवाह सोहळा झाला. संस्थेचे संस्थापक पांडुरंग वाळवेकर व संस्थापक अध्यक्षा अलका वाळवेकर यांनी नववधु-वरास शुभाशीर्वाद दिले.
रोकडे हे बालगृहातील माजी विद्यार्थी असून माळी ह्या कन्या निरीक्षणगृहातील माजी विद्यार्थिनी आहेत. या सोहळ्यात अध्यक्ष संतोष वाळवेकर व सचिव सोनल वाळवेकर यांनी कन्यादानाची जबाबदारी पूर्ण केली. या सोहळ्यात उभयंताना आशीर्वाद देण्यासाठी बाल कल्याण समिती अध्यक्षा वैशाली बुटाले, सदस्य कांचन आंगडी, व्ही. बी. शेटे, गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक रविकांत बच्चे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बाजीराव पोवार, मनीषा शिंदे-गायकवाड, आसावरी वाळवेकर, प्रशांत वाळवेकर, बापूसाहेब जगदाळे बालगृहातील व कन्या निरीक्षणगृहातील माजी विद्यार्थी उपस्थित होते. विवाह सोहळ्याचा सर्व खर्च व नियोजन संतोष वाळवेकर यांनी केले.
फोटो नं.२६०६२०२१-कोल-मॅरेज०१
ओळ : सरस्वती महिला शिक्षण संस्था कागल यांच्या कणेरीवाडी संस्थेत शनिवारी बालगृहातील माजी विद्यार्थी दिगंबर रोकडे आणि कन्या निरीक्षणगृहातील माजी विद्यार्थिनी अमृता माळी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रशांत वाळवेकर, संतोष वाळवेकर, सोनाली वाळवेकर, मनीषा शिंदे आदी उपस्थित होते.
===Photopath===
260621\26kol_13_26062021_5.jpg
===Caption===
ओळ : सरस्वती महिला शिक्षण संस्था कागल यांच्या कणेरीवाडी संस्थेत शनिवारी बालगृहातील माजी विद्यार्थी दिगंबर रोकडे आणि कन्या निरीक्षणगृहातील माजी विद्यार्थींनी अमृता माळी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रशांत वाळवेकर, संतोष वाळवेकरश सोनाली वाळवेकर, मनिषा शिंदे आदी उपस्थित होते.