हळद पाडव्याआधीच बाजारात
By Admin | Updated: March 2, 2016 00:02 IST2016-03-01T23:57:36+5:302016-03-02T00:02:13+5:30
नांदेड: जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी घटल्याने यावर्षी गुढीपाडव्याच्या तब्बल महिनाभर अगोदरच नवा मोंढा बाजारात हळद दाखल झाली आहे.

हळद पाडव्याआधीच बाजारात
नांदेड: जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी घटल्याने यावर्षी गुढीपाडव्याच्या तब्बल महिनाभर अगोदरच नवा मोंढा बाजारात हळद दाखल झाली आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे दर्जा घसरल्याने शुक्रवारी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला प्रतिक्विंटल ८ ते ८३०० हजार रुपयापर्यंत भाव मिळाला. यादिवशी जवळपास दहा क्विंटल हळदीचा व्यवहार झाला. याशिवाय नवीन गव्हाचीही मोंढा बाजारात आवक झाली असून गव्हाला मात्र २०५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. तर यापूर्वी बाजारात गव्हाचे दर १६०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे होते. शुक्रवारी लिलाव बाजारात ५७ क्विंटल गव्हाची आवक झाली.
भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना हळद व गहू या पिकासाठी पाणी देणे अपुरे पडले. त्यामुळे हळदीचे खोंब म्हणावे तसे भरले नसल्याने त्याचा उत्पादनावर आणि दर्जावर परिणाम झाला आहे.
काही भागात एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन येणे अपेक्षित असताना त्याचा उतारा ६ ते ७ क्विंटलवर आला आहे. तर पाण्याचे प्रमाण बऱ्यापैकी असलेल्या भागातही हळदीच्या उताऱ्यात निम्म्याहून अधिक घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. सर्व संकटाचा सामना करीत पदरात पडलेल्या हळदीला चांगला भाव मिळावा, असे वाटत असले तरी सद्य:स्थितीला जुन्या हळदीपेक्षाही कमी भाव मिळत आहेत. परंतु येत्या काही दिवसात हळदीची आवक वाढल्यास दुष्काळामुळे उत्पादन घटणार असल्याने दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी